सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू

सोलापूर : सोलापूरमध्ये भीषण अपघाताची घडली आहे. सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील रूद्देवाडी बसस्थानकाजवळ अपघात घडला आहे. एसटी बस व मुरूमाने भरलेल्या डंपरचा भीषण अपघात झाला असून हा अपघात आज सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. हृदयद्रावक म्हणजे अपघातानंतर डंपरने पेट घेतल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. (Serious accident on Solapur-Akkalkot highway)


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्कलकोट होऊन गाणगापूर कडे जाणाऱ्या बसला रुद्देवाडी बसस्थानकाजवळ मुरूमाने भरलेल्या डंपरने समोरून धडक दिली. या धडकेत एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातानंतर पुढे जाऊन डंपर उलटला आणि डंपरने पेट घेतला. बसमधील अनेक प्रवासी किरकोळ तर काही प्रवास गंभीर जखमी झाले आहेत. (Serious accident on Solapur-Akkalkot highway)


या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अपघातानंतर मदतीसाठी ग्रामस्थ धावले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी