IPL 2026 : आयपीएलमध्ये पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ ‘धुरंधर’

वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशीने साधली किमया


मुंबई : लखनौच्या ताफ्यातून अक्षत रघुवंशी या युवा बॅटरने मुंबई इंडियन्स विरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना पहिल्याच चेंडूवर षटकार मारत खास विक्रमाला गवसणी घातली. आयपीएल पदार्पणात पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा तो वैभव सूर्यवंशी याच्यानंतर ११ वा फलंदाज ठरला आहे. २०२५ च्या हंगामात अवघ्या १४ व्या वर्षी आयपीएल पदार्पणाचा सामना खेळताना वैभव सूर्यवंशी याने लखनौ विरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर षटकार मारत आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. असा पराक्रम करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला.


सध्याच्या घडीला दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसणारा समीर रिझवी या युवा भारतीय फलंदाजाने २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल पदार्पण करताना राशिद खानच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून मैफील लुटली होती. श्रीलंकन महेश तीक्षणा हा देखील या यादीत आहे. २०२२ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून आरसीबीविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. सिद्धेश लाड याने २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाचा सामना खेळताना पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारत लक्ष वेधून घेतले होते.


वेस्ट इंडिजचा पॉवर-हिटर जावोन रॅमन सेर्ल्सने २०१८ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना पंजाब किंग्स विरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. जलगती गोलंदाज अनिकेत चौधरी याने २०१७ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून खेळताना सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारत सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले होते. कार्लोस ब्रॅथवेट याने २०१६ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून कोलकाता विरुद्ध पदार्पणाचा सामना खेळताना षटकार मारून धमाकेदार अंदाजात आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती.


केकेआरच्या ताफ्यातून आयपीएलमध्ये आपली खास ओळख निर्माण करणारा मसल पॉवर आंद्रे रसेल याने २०१२ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत धमाकेदार अंदाजात आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू केव्हॉन कूपर याने २०१२ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून पंजाबविरुद्ध आयपीएल पदार्पण करताना षटकारासह खाते उघडले होते. ऑस्ट्रेलियन डावखुरा फलंदाज रॉब क्विनी हा आयपीएलच्या इतिहासातील असा पहिला पहिला फलंदाज आहे, ज्याने षटकारासह आयपीएलमध्ये एन्ट्री मारली. २००९ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून कोलकाता विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण करताना हा पराक्रम करून दाखवला होता.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त