Chief Minister's Medical Fund : 'मुख्यमंत्री वैद्यकीय निधी'ने दाखवला माणुसकीचा मार्ग!

मृत्यूच्या दाढेतून परतला महाडचा सुपुत्र; कॅन्सरग्रस्त रुग्णाला तब्बल १५ लाखांची मदत


मुंबई : कर्करोगासारख्या महाभयंकर आजाराशी लढा देणाऱ्या महाड येथील एका सर्वसामान्य रुग्णाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीने जीवनदान दिले आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असताना, मयूर चांदुरकर (४२) यांच्यावर वेळेवर उपचार झाल्याने त्यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील व जनहितैषी भूमिकेमुळे या गोरगरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.



मयूर चांदुरकर यांना गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून किडनीचा आजार होता. त्यातच अचानक त्यांचे वजन वेगाने कमी होऊ लागल्याने आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तपासणीत त्यांचे हिमोग्लोबिन अत्यंत कमी असल्याचे निष्पन्न झाले. रक्त चढवूनही प्रकृती स्थिर राहत नसल्याने डॉक्टरांनी अधिक चाचण्या केल्या. त्यातून त्यांना रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर) असल्याचे समोर आले. मयूर चांदुरकर हे महाडमध्ये किरकोळ व्यवसाय करून आपल्या वृद्ध आई-वडील, आजी, पत्नी आणि दोन लहान मुलांचा उदरनिर्वाह करतात. अशा बिकट परिस्थितीत उपचारासाठी लागणारा १५ ते १८ लाखांचा अवाढव्य खर्च करणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय होते.



संकटाच्या या घडीत चांदुरकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’विषयी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी अर्ज केला. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याकडे त्यांनी आपली कैफियत मांडली.


मुख्यमंत्र्यांचे मानले आभार


- या प्रकरणाची तत्परतेने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचे निर्देश दिले. त्यानुसार, मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. एवढेच नव्हे तर, कक्ष प्रमुखांनी पुढाकार घेत टाटा ट्रस्टकडून १० लाख रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत मिळवून दिली. या भरीव मदतीमुळे चांदुरकर यांच्यावरील उपचारांचा मार्ग मोकळा झाला.


- सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून, १६ एप्रिल २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कर्करोगावर यशस्वी मात करून ते पुन्हा आपल्या घरी परतले आहेत. या कठीण प्रसंगात पाठीशी उभ्या राहिलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल चांदुरकर कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.


"राज्यातील कोणताही रुग्ण पैशांअभावी उपचारापासून वंचित राहता कामा नये, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांना सातत्याने मदत केली जात आहे. गरजू रुग्णांनी उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा."


- रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष


Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या