Devendra Fadanvis : लैंगिक अत्याचारातील आरोपींना पॅरोल देऊ नका!

 नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधी आणि न्याय विभागाला निर्देश


मुंबई : पुण्यातील नसरापूर (भोर) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना पॅरोल देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.


कॅबिनेट बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, लैंगिक गुन्ह्यांमधील ८० ते ९० टक्के आरोपी हे पूर्वीच्याच गुन्ह्यात जामीन किंवा पॅरोलवर सुटलेले असतात आणि त्या काळात ते पुन्हा असेच गंभीर गुन्हे करतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी २०१४ ते २०१९ या काळात आपण मुख्यमंत्री असताना अशा गुन्हेगारांना पॅरोल न देण्याचा कायदा केला होता. काही काळ तो अमलातही होता; परंतु नंतर तो न्यायालयाने रद्दबादल केला. आता यावर कोणताही पर्याय नसताना पुन्हा नव्याने कठोर कायदा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत.



नसरापूरमधील दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा संवाद साधला आहे. याविषयी माहिती देताना ते म्हणाले, "अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली जावी, अशी भावना सर्वांचीच असते. मात्र, लोकशाही कायद्याने चालते. त्यामुळे कायद्यात कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा होईल, यादृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या प्रकरणाचे दोषारोपपत्र (चार्जशीट) वेळेत दाखल करून हा खटला उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालवला जाईल. तसे लेखी आश्वासन पीडितेच्या कुटुंबालाही देण्यात आले आहे."



काय घडले होते नसरापूरमध्ये?


पुण्यातील नसरापूर येथे सुट्टीनिमित्त आजीच्या घरी आलेली चार वर्षांची चिमुकली १ मे रोजी घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी ६५ वर्षीय आरोपीने तिला ओढून गोठ्यात नेले आणि तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार केले. इतक्यावरच तो थांबला नाही, तर क्रूरतेची हद्द ओलांडत त्याने चिमुकलीला दगडाने ठेचून ठार मारले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून पळ काढला. या नराधमाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या अमानुष घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईत दीड वर्षांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं पुरावे नष्ट करण्यासाठी वापरली शक्कल

मुंबई: मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेतील दिंडोशी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव पूर्वेतील

abvp protest mumbai university : ‘बांगलादेशसारख्या अराजकतेला भारतात थारा नको!’; संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई विद्यापीठात अभाविपतर्फे भव्य स्वाक्षरी अभियान व निदर्शने

मुंबई : देशातील लोकशाही व्यवस्था मजबूत राखणे, भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रीय एकात्मता

Virar News: विरारमध्ये ज्युनिअर आर्टिस्टची आत्महत्या, अश्लील व्हिडिओंच्या आधारे कोट्यवधींची खंडणी उकळल्याचा आरोप

विरार: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकाराला कंटाळून

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु