प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या, पाकिस्तानात खळबळ

Idris Tarangzai shot dead : पाकिस्तानमधील प्रसिद्ध धार्मिक गुरु तसेच 'शेखुल हदीस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौलाना मुहम्मद इदरीस तरंगजई याची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून अज्ञात हल्लेखोरांनी मुहम्मद इदरीस तरंगजई याची गोळ्या झाडून हत्या केलीय. विशेष म्हणजे, मारला गेलेला मौलाना हा कुख्यात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा कट्टर समर्थक होता.


पाकिस्तानी प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौलाना इदरीस तरंगजई गाडीतून प्रवास करत होता. यावेळी 'मुस्लिम मॉडेल स्कूल'जवळील रस्त्यावरून जात असताना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मौलानांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले दोन पोलीस कॉन्स्टेबलदेखील गंभीर जखमी झाले आहेत. (Idris Tarangzai shot dead)


घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओतुन या हल्ल्याची भीषणता दिसून येते. फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाच्या एका गाडीची मागची काच पूर्णपणे फुटलेली दिसत असून गाडीवर गोळ्यांच्या अनेक खुणा आहेत. या हल्ल्यानंतर परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. (Idris Tarangzai shot dead)


इदरीस तरंगजई कोण होता ? (Idris Tarangzai)


मौलाना इदरीस हा पाकिस्तानातील कट्टरपंथी वर्तुळात प्रभावशाली चेहरा होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी असलेल्या त्याच्या जवळच्या संबंधांमुळे तो अनेकदा चर्चेत असायचा. या हत्येमागे अंतर्गत वादाचा हात आहे की ही टार्गेट किलिंगची घटना आहे, याचा तपास पाकिस्तानी पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.