Gold Silver Rate : सोन्याची चमक फिकी! दोन दिवसांत मोठी घसरण; चांदीही स्वस्त

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना सोनं-चांदी खरेदीची आवड असते. मात्र सध्या या मौल्यवान धातूंचे दर इतक्या वेगाने चढ-उतार होत आहेत की खरेदी करताना ग्राहक संभ्रमात पडत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी, विशेषतः अमेरिका-इराण तणाव, डॉलरची मजबुती आणि जागतिक बाजारातील अनिश्चितता याचा थेट परिणाम सराफा बाजारावर होत आहे. त्यामुळे सोनं-चांदीच्या किमती सतत वर-खाली होताना दिसत आहेत. (Gold Silver Rate)



अशातच आज म्हणजेच मंगळावर ५ मे रोजी सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली आहे. मजबूत होत असलेल्या डॉलरमुळे आणि पश्चिम आशियातील तणाव काहीसा कमी झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी घटली आहे. परिणामी, दोन दिवसांत २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम १३२० रुपयांनी, तर २२ कॅरेट सोनं १२१० रुपयांनी स्वस्त झालं आहे. राजधानी दिल्लीत आज २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रत्येकी १० रुपयांची घट झाली आहे.



चांदीच्या दरातही घसरण :


सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही बदल दिसून आला आहे. सलग दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज चांदीच्या किमतीत घट झाली. दिल्लीत चांदी प्रति किलो १०० रुपयांनी स्वस्त होऊन २,६६४,९०० रुपयांवर आली आहे. मुंबई आणि कोलकाता येथेही जवळपास हाच दर कायम आहे. मात्र चेन्नईमध्ये चांदीचा दर २,६९,९०० रुपये प्रति किलो इतका असून, चार प्रमुख महानगरांमध्ये सर्वाधिक दर चेन्नईत आहे.



यापूर्वीच्या दोन दिवसांत चांदीच्या किमतीत तब्बल १५०० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे आता आलेली घसरण ही काहीशी दिलासादायक मानली जात आहे.



सोन्याचा पुढील कल काय?


तज्ज्ञांच्या मते, डॉलर मजबूत होत असताना आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना सोन्यावर दबाव येतो. तसेच अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता कमी असल्यानेही सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे.


मात्र, काही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या अंदाजानुसार दीर्घकालीन चित्र वेगळं असू शकतं. जागतिक मध्यवर्ती बँकांकडून वाढती खरेदी आणि भविष्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता यामुळे सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. अंदाजानुसार, वर्षअखेरपर्यंत सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.६३ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.



एकूणच, सध्याच्या अस्थिर बाजारपेठेमुळे सोनं-चांदी खरेदी करताना ग्राहकांनी सावध राहणं गरजेचं असून, गुंतवणुकीपूर्वी बाजारातील ट्रेंड लक्षात घेणं महत्त्वाचं ठरत आहे.


देशातील मोठ्या शहरांत १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत किती ते जाणून घेऊया..



 
Comments
Add Comment

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी