Met Gala 2026 : म्हणून प्रियांका आणि दीपिकाने स्किप केलं मेट गाला २०२६

न्यू यॉर्क : जगातील सर्वात ग्लॅमरस फॅशन इव्हेंट 'मेट गाला २०२६' ४ मे रोजी सुरु झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेगळे आणि हटके फॅशन, आऊटफिट पाहायला मिळत आहेत. मेट गाला २०२६ ची यावर्षीची थीम 'कॉश्च्युम आर्ट' आहे आणि ड्रेस कोड 'फॅशन इज आर्ट' असा आहे . या थीमनुसार कलाकारांनी कपडे परिधान केले असून इव्हेंट्सला चार चांद लागले आहेत.



भारतामधून या कलाकारांनी घेतला सहभाग


भारतामधून इशा अंबानी, नताशा पुनावाला, मनीष मल्होत्रा, कारण जोहर, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांसारख्या कलाकारांनी सहभाग घेतला आहे. परंतु दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या इव्हेंट्सचा भाग नसतील अश्या बातम्या समोर आल्या होता. या बातमीवर शिक्कामोर्तब करत प्रियंका आणि दीपिकाने या मेट गाला २०२६ मध्ये उपस्तीथी दर्शवलेली नाही. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीच्या चर्चा रंगल्या आहेत.



प्रियांका उपस्थित राहू शकली नाही कारण....


सध्या ती ६ मी रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'सिडाटेल' च्या आगामी सिजनच्या प्रसिद्दीसाठी एका मोठ्या भागतील पत्रकार दौऱ्यात व्यस्त आहे. त्यानंतर लगेचच ती गोल्ड हौस गालासाठी लॉस एंजेलिसला जाणार आहे, तिथे तिचा ग्लोबल व्हॅनगार्ड पुरस्काराने सन्मान होणार आहे.



दीपिका पदुकोण चित्रपटात व्यस्त


यापूर्वी दीपिका २०१७, २०१८, २०१९ मध्ये मेट गालामध्ये सहभागी झाली होती. परंतु दीपिका सध्या तिच्या कामांमध्ये प्रचंड व्यस्त आहे, दीपिकाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ती दोन प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहे. चित्रपट हे तिचे नेहमीचे प्राधान्य राहील आहे आणि पुढेही राहील. 'किंग' हा सिनेमा २०२६च्या अखेरीस आणि 'राका' पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याने दोन सिनेमांचे चित्रीकरण पूर्ण करणे सध्या तिचे प्राधान्य आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’