Yeola : नगर-मनमाड महामार्गावर पेट्रोल-डिझेलचा टँकर उलटला; गोपाळवाडी फाट्याजवळ भीषण अपघात

येवला : नगर-मनमाड महामार्गावरील (Nagar-Manmad highway) येवला तालुक्यातील गोपाळवाडी फाट्याजवळ आज मंगळवार दि ५ रोजी दुपारी दीड च्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलने भरलेला एक टँकर उलटल्याची भीषण दुर्घटना घडली. या अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणावर इंधन गळती सुरू झाल्याने परिसरात 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला होता. दरम्यान, महामार्ग पोलीस आणि येवला तालुका पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी व आगीचा मोठा अनर्थ टळला आहे.


पेट्रोल आणि डिझेलचा साठा घेऊन जाणारा हा टँकर गोपाळवाडी गावाच्या हद्दीत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने हा टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार आदळला आणि पलटी झाला. टँकर पलटी होताच त्यातील पेट्रोल आणि डिझेल वेगाने रस्त्यावर वाहू लागले. (Petrol-diesel tanker overturned on Nagar-Manmad highway)


सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमान प्रचंड वाढलेले आहे. पेट्रोल आणि डिझेल हे अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्याने साध्या ठिणगीनेही मोठा स्फोट होण्याची शक्यता होती. इंधन गळतीमुळे परिसरात इंधनाचा उग्र वास पसरला होता. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येताच महामार्ग पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. आणि मोठा अनर्थ टळला.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी