'Raja Shivaji' : ‘तासनतास श्वास रोखून…’ अफजलखानाच्या ६३ बेगमच्या हत्येचा थरारक सीन; अभिनेत्रीनं सांगितली कहाणी

मुंबई : ‘राजा शिवाजी’ या सिनेमातील अफजलखानाच्या बेगमच्या हत्येचा तो थरारक सीन प्रेक्षकांना अक्षरशः स्तब्ध करून सोडतो. पण या सीनमागे किती मेहनत आणि धाडस दडलं आहे, याची खास माहिती स्वतः त्या अभिनेत्रीनेच उघड केली आहे.



राजा शिवाजी हा रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला सिनेमा सध्या थिएटरमध्ये जोरदार कमाई करत असून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवत आहे. या सिनेमात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार पहायला मिळत आहेत. अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन ते भाग्यश्री, महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने सिनेमाला वेगळी उंची मिळवून दिली आहे.


या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अनेक लहान-मोठे कलाकारही झळकत आहेत. तसेच मालिकांच्या दुनियेतील काही लोकप्रिय चेहरेही या सिनेमात दिसतात. विशेष म्हणजे, सिनेमातील लढाईचे सीन्स अत्यंत भव्य आणि वेगळ्या पद्धतीने शूट करण्यात आले असून त्यासाठी परदेशातून खास अ‍ॅक्शन टीम बोलावण्यात आली होती.



या सिनेमात काही अत्यंत साहसी आणि धोकादायक सीन्सदेखील आहेत. त्यापैकी एक म्हणजे पाण्याखाली शूट करण्यात आलेला अंडरवॉटर सीन. कथेनुसार, स्वराज्याच्या दिशेने निघालेल्या अफजलखानाला पीर बाबाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यानंतर शेवटच्या भेटीसाठी त्याच्या ६३ बेगम त्याच्याकडे येतात आणि त्या सर्वांची तो पाण्यात बुडवून हत्या करतो.


या थरारक सीनमध्ये मराठी अभिनेत्री दिशा परदेशी हिने अफजलखानाच्या बडी बेगमची भूमिका साकारली आहे. या सीनच्या शूटिंगसाठी दिशा आणि इतर कलाकारांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या संपूर्ण अनुभवाबद्दल दिशाने सोशल मीडियावर सविस्तर माहिती शेअर केली आहे.


दिशाने या सीनचे काही BTS फोटो शेअर करत लिहिलं, “राजा शिवाजीमधील त्या बहुचर्चित आणि प्रभावी पाण्याखालील दृश्याचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास अनुभव होता.”





ती पुढे म्हणाली, “अफजलच्या बेगमच्या भूमिकेतून त्या प्रसंगाची ‘वेदना’ आणि ‘तीव्रता’ साकारताना मला खूप काही शिकायला मिळालं.”


या संपूर्ण वॉटर सीनबद्दल बोलताना दिशाने सांगितलं, “या सीनसाठी रितेश सरांनी आम्हा सगळ्यांना आधीपासूनच उत्कृष्ट ट्रेनिंग दिलं होतं. पाण्याखाली अभिनय करणं, तासनतास श्वासावर नियंत्रण ठेवणं आणि प्रत्येक शॉटसाठी अचूक तयारी करणं, हे सगळं अत्यंत बारकाईने प्लॅन केलं गेलं होतं. त्यामुळे सेटवर आम्हाला पूर्णपणे सुरक्षित आणि आत्मविश्वास वाटत होता.”


ती पुढे म्हणाली, “सुरक्षेपासून ते शॉट डिव्हिजनपर्यंत प्रत्येक गोष्टीची अतिशय काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे इतका कठीण आणि धोकादायक सीनदेखील आम्हाला सहजपणे पूर्ण करता आला. अशा टीमसोबत काम करणं खरंच भाग्याची गोष्ट आहे.”

Comments
Add Comment

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार