मुंबई : राजा शिवाजी हा रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला असून, रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करत आहे.
वर्ल्डवाइड स्तरावरही ‘राजा शिवाजी’ने चांगली झेप घेतली आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने एकूण ४०.३४ कोटी रुपयांचा टप्पा गाठला असून, चौथ्या दिवसाचे अधिकृत आकडे अजून समोर आलेले नाहीत. मात्र ट्रेड अॅनालिस्ट्सनुसार पुढील दिवसांतही कमाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या चित्रपटाची कथा मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, रणनीती आणि नेतृत्वावर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि सहलेखन रितेश देशमुख यांनी केले असून, निर्मिती जेनेलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी मुंबई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओज यांच्या बॅनरखाली केली आहे.
भव्य सेट, ऐतिहासिक मांडणी आणि दमदार अभिनयामुळे ‘राजा शिवाजी’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, हा चित्रपट २०२६ मधील सर्वात मोठ्या हिट्सपैकी एक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






