Former IPS officer Meera Borwankar : 'त्या' निव्वळ अफवा, मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीवर सरकारचं स्पष्टीकरण

Maharashtra State Commission for Women : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी आणि निराधार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण दिले असून, अशा कोणत्याही नियुक्तीचा निर्णय झालेला नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच या अफवा असल्याचे डॉ. मीरा बोरवणकर यांनीदेखील कळविले आहे.


नेमकं प्रकरण काय ?


पुण्यातील नसरापूर येथे ४ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्याबद्दल राज्य सरकारवर टीका केली होती.


यावेळी रोहित पवार यांनी मागणी केली होती की, “महिला आयोगावर कोणत्याही राजकीय व्यक्तीची नियुक्ती न करता, मीरा बोरवणकर किंवा मेधा गाडगीळ यांच्यासारख्या अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.” या विधानानंतर सोशल मीडियावर मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. मात्र, एएनआयने सुध्दा या वृत्ताचे खंडन केले आहे.


तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली, ही अफवा असून मी सध्या उन्हाळी सुट्टीत न्यूझीलंडमध्ये असल्याचे डॉ. मीरा बोरवणकर यांनी कळविले आहे. वरील पदाची जबाबदारी स्वीकारण्यासंदर्भात आपल्याला राज्य शासनाकडून विचारणा झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


मीरा बोरवणकर कोण आहेत ?


मीरा बोरवणकर या १९८१ च्या बॅचमधील महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रात त्यांना ‘लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखले जाते. १९९४ मध्ये जळगावमधील बहुचर्चित सेक्स स्कँडल उघडकीस आणण्यात आणि गुन्हेगारांना जेरबंद करण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख असताना त्यांनी दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या टोळ्यांचे कंबरडे मोडले. अबू सालेम आणि इक्बाल मिर्ची यांच्या प्रत्यार्पणातही त्यांचा मोठा वाटा होता. येरवडा तुरुंग महानिरीक्षक असताना याकूब मेमनच्या फाशीची प्रक्रिया त्यांच्याच देखरेखीखाली पार पडली होती.


निवृत्तीनंतर त्यांनी लिहिलेल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या काही आरोपांमुळे त्या पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या होत्या.

Comments
Add Comment

Dahihandi 2026 : दहीहंडीच्या थरावर साकारली पावनखिंड; मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाच्या देखाव्याला दादरकरांची उत्स्फूर्त दाद

मुंबई : राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असून, मुंबईतही ठिकठिकाणी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे

BMC Engineers Transfer : महापालिकेतील प्रमुख अभियंत्यांच्या बदल्या

पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण आणि इमारत परिरक्षण विभागात फेरबदल मुंबई (विशेष प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या

Mumbai Water Crisis : पाण्याच्या तक्रारींमागील कारणे शोधा, तक्रारींचे निराकारण झाल्यानंतर स्थानिकांशी संवाद साधा

महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या विविध

DahiHandi 2026 : दहिहंडी उत्सवासाठी संभाव्य जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी महापालिका रुग्णालयात व्यवस्था 

मोफत वैद्यकीय उपचार करणार, अतिरिक्त  आयुक्त (शहर)  प्राजक्ता  लवंगारे यांचे निर्देश तब्बल १०० हून अधिक रूग्ण खाटा

Municipal Corporation New Sabhagruha : महापालिका नवीन सभागृहाचा प्रस्ताव लवकरच मंजुरीला

नवीन वास्तूत केवळ नगरसेवकांच्या ६० वाहनांचीच क्षमता नगरसेवकांची वाहने पार्क करण्याची समस्या राहणार

SGNP Rehabilitation : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या ४ हजार रहिवाशांचे पुनर्वसन होणार

पनवेल आणि कल्याणमध्ये स्थलांतरित होण्याचा वाद मिटला; पुढील टप्प्यात १६ हजार नागरिकांचे पुनर्वसन मुंबई :