DahiHandi 2026 : दहिहंडी उत्सवासाठी संभाव्य जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी महापालिका रुग्णालयात व्यवस्था 

मोफत वैद्यकीय उपचार करणार, अतिरिक्त  आयुक्त (शहर)  प्राजक्ता  लवंगारे यांचे निर्देश


तब्बल १०० हून अधिक रूग्ण खाटा सज्ज


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दहिहंडी उत्सव  हा संपूर्ण मुंबईत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गोविंदा सहभागी होत असता. मुंबई शहरांसह पूर्व व पश्चिम उपनगरांत हा दिवस ऐतिहासिक ठरावा यासाठी विविध गोविंदा पथक अथक प्रयत्न करीत असतात. गोकुळाष्टमीच्या दिवशी दहिहंडी फोडताना  एखादा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने रूग्णालयांना सज्ज राहण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. तसेच जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश अतिरिक्त  आयुक्त (शहर)  प्राजक्ता लवंगारे यांनी दिले आहेत.


मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील रूग्णालयांचे अधिष्ठाता, मुख्य वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिक्षक यांनी गोविंदाच्या उपचारासाठी सज्ज रहावे, असे निर्देश अतिरिक्त  आयुक्त (शहर)  प्राजक्ता लवंगारे यांनी दिले आहेत.



मुंबई महानगरीची एक महत्त्वाची सांस्कृतिक ओळख असणा-या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात, ही संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालय आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच १६ उपनगरीय रूग्णालयातही १०५ रूग्णशय्या सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५ ते १० खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.


या व्यवस्थे अंतर्गत निर्धारित पद्धतीनुसार किरकोळ जखमी झालेल्या गोविंदांवर प्रथमोपचार करुन त्यांना घरी सोडण्यात येते. तर, गंभीर जखमी आणि दीर्घकाल उपचारांची आवश्यकता असलेल्या गोविंदांसाठीही उपचार सुविधा देण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेने ३ पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांची यांची नियुक्ती केली आहे. 


महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये सर्व औषधे, इंजेक्शन आणि सर्जीकल मटेरिअल, पीओपी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एक्स रे व इतर मशीनही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सर्व रूग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांनी या काळात दक्ष रहावे, अशा सूचनाही महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांना व आरोग्य यंत्रणेला प्रशासनामार्फत करण्यात आल्या आहेत.
Comments
Add Comment

वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडचे बाधित क्षेत्र ४० हजार चौरस मीटरने वाढले, विकास नियोजन रस्ता आणि कोस्टल रोडची रुंदी वाढवणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई कोस्टल रोड उत्तरचे बांधकाम केले जात असून या प्रकल्प कामांसाठी वर्सोवा ते गोरेगाव

मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशन अडकले, आता कोस्टल रोडसाठी होणार त्याच जमिनीचे संपादन

मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या मोगरा नाल्याच्या बांधकामाला जमिन मालकाने आक्षेप घेत

अमेरिकेचा हा बडा नेता थेट मुंबईच्या रस्त्यावर; गेटवे ऑफ इंडियावर मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय घडलं?

मुंबईच्या ऐतिहासिक आणि डौलदार अशा गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनपेक्षित भेटीने

Mumbai Fire: कुर्ल्यात 12 मजली इमारतीत अग्नितांडव! 5 वर्षांच्या चिमुकल्यासह 9 जखमी; रूग्णावर उपचार सुरू

मुंबई: मुंबईतील कुर्ल्यामध्ये ऐन दसऱ्याच्या दिवशी आगीची घटना घडली आहे. कुर्ला पश्चिमेतील कोहिनूर HDIL इमारतीमध्ये

मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्प कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा, आयुक्तांनी पुन्हा प्रकल्प कामांची कमान घेतली हाती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक सुगम आणि अखंड करण्याच्या उद्देशाने

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या बोगदा खणन कामाला गती! ‘तुळशी’द्वारे १८३ मीटर खोदकाम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड