Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

रिक्त जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक; छगन भुजबळ केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना वेग


मुंबई : राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बुधवारी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची नवी दिल्ली येथे भेट घेत त्यांनी आपले राजीनामा पत्र सुपूर्द केले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी होऊन आमदार झाल्यानंतर, नियमानुसार त्यांनी हा राजीनामा दिला आहे. दरम्यान, या रिक्त जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार असून, मंत्री छगन भुजबळ यांच्या रूपाने एक ज्येष्ठ नेता दिल्लीत पाठवला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.



नियमावलीनुसार, कोणत्याही लोकप्रतिनिधीने दोन्ही सभागृहांत (विधानसभा आणि संसद) एकाच वेळी राहू नये, यासाठी १४ दिवसांच्या आत एका सभागृहाचा राजीनामा देणे बंधनकारक असते. त्यानुसार, बारामती विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी बुधवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांना तब्बल २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्याविरोधातील २२ उमेदवार आणि 'नोटा'ला मिळून अवघी ४ हजार ८३७ मते मिळाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये नोंदवलेला मताधिक्याचा विक्रम मोडीत काढत सुनेत्रा पवार यांनी हा विजय संपादन केला. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यापूर्वीच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हेही खासदार झाले असून, गेल्याच महिन्यात त्यांनी राज्यसभेची शपथ घेतली होती.




छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत

सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या शर्यतीत तीन प्रमुख नावांची चर्चा असून, त्यापैकी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. भुजबळ हे साध्य फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून, राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील केंद्रीय मंत्रिपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या शर्यतीत दुसरे महत्त्वाचे नाव जय पवार यांचे आहे. सुरुवातीला त्यांना विधान परिषदेवर पाठवून आमदारकी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, पक्षाने विधान परिषदेसाठी झिशान सिद्दिकी यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे आता त्यांना राज्यसभेवर पाठवले जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर जय पवार यांना राज्यसभेवर संधी मिळाली, तर पार्थ पवार यांच्यापाठोपाठ जय पवार देखील संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाहायला मिळतील. तिसरे नाव म्हणजे नितीनकाका पाटील. सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई येथील एका प्रचारसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितीनकाका पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. आता अजित पवार यांच्या पाश्चात पक्षाकडून हा शब्द पाळला जातो का, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला