SBI Bank Employee Strike: बँकेची कामं पटापट करून घ्या, सलग ४ दिवस बँका बंद, SBI कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

SBI Bank Employee Strike: SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांना महत्त्वाची सूचना दिली आहे. बँकिंग संदर्भातील काही काम असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. बँकेचं कामकाच जवळपास चार दिवस ठप्प राहण्याची शक्यता आहे. बँकेचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. SBI कर्मचारी संघटनांनी दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे दोन दिवसांचा संप आणि दोन दिवसांच्या सुट्ट्या, अशाप्रकारे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळेच, ग्राहकांनी बँकेशी संबंधित कामे तात्काळ करून घेणे आवश्यक आहे.


सलग ४ दिवस बँका बंद


AISBISF (ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन) ने दिलेल्या माहितीनुसार, २५ आणि २६ मे रोजी SBI कर्मचारी संपावर जाणार आहेत. हा संप दोन दिवसांचा असला तरी प्रत्यक्षात ग्राहकांना चार दिवस बँकिंग सेवांचा फटका बसू शकतो. २३ मे रोजी चौथा शनिवार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. २4 मे रोजी रविवार आहे. तर २५ मे आणि २६ मे रोजी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे त्यामुळे या दोन दिवस देखील बँका बंद राहण्याची शक्यता आहे. एकूणच ४ दिवस सलग बँका बंद राहण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी बँकेशी संबंधित कामे तात्काळ करून घेणे आवश्यक आहे.



कर्मचाऱ्यांनी संप का पुकारला ?


AISBISF च्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करण्यात आल्याने हा संप पुकारण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी खालील मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली आहे:


बँकेत कर्मचाऱ्यांची कमतरता


नोकरीच्या अटी व नियमांबाबत समस्या


भरती प्रक्रियेतील अडचणी


पेन्शनसंबंधित प्रश्न


पूर्वी झालेल्या करारांची अंमलबजावणी न होणे


फेडरेशनने २ मे रोजी SBI चे अध्यक्षांना नोटीस देत हा संप Industrial Disputes Act, 1947 अंतर्गत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.



कोणत्या सेवा बंद राहणार ?


कर्मचाऱ्यांनी संप केल्यानं बँकेच्या शाखा असल्या तरी ऑनलाईन सेवांवर परिणाम होणार नाही. मात्र यामुळं शाखेतील कामं होऊ शकणार नाहीत. चेक जमा करणे, रोख रक्कम जमा करणे, पासबुक अपडेट आणि शाखेतून होणारे इतर व्यवहार होऊ शकणार नाहीत.


ग्राहकांनी काय काळजी घ्यावी ?


ग्राहकांनी रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स किंवा शाखेत जाऊन कराव्या लागणाऱ्या कामांचे नियोजन आधीच करून ठेवावे. विशेषतः व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी व्यवहारांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Indonesia Volcano Eruption : इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; जकार्तासह अनेक भाग राखेच्या विळख्यात, विमानसेवा तात्पुरती स्थगित

जकार्ता : इंडोनेशियाच्या सुंडा सामुद्रधुनीत स्थित ‘अनाक क्राकाटोआ’ ज्वालामुखीचा रविवारी पहाटे अचानक उद्रेक

Palghar Hospital Dispute : पालघरमध्ये जखमी गोविंदांच्या उपचारावरून रुग्णालयात गोंधळ; शिवसेना जिल्हाप्रमुखांसह 17 जणांवर तक्रार दाखल

पालघर : पालघरमध्ये दहीहंडी (DahiHandi) उत्सवा दरम्यान जखमी झालेल्या गोविंदांच्या उपचारावरून

IIT Admission Scam : IITमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली १६.५ लाखांची फसवणूक; बनावट SIM पुरवणाऱ्या रॅकेटचा पवई पोलिसांकडून पर्दाफाश

मुंबई : बनावट इंजिनिअरिंग अ‍ॅडमिशनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीला अनधिकृतपणे सक्रिय केलेले SIM कार्ड

IND vs PAK Cricket Match : शेफालीचा सिक्स फातिमाच्या जिव्हारी! विकेट घेताच पाकिस्तानी कॅप्टनने केलं आक्रमक सेलिब्रेशन, टीव्ही अँकर विवेक राजदान म्हणाले...

वुमेन्स आशिया कप २०२६ मधील ९ व्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. रोमांचक लढत

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! इंग्लंड दौऱ्यावर पीसीबीने जप्त केले खेळाडूंचे मोबाईल फोन; मॅच फिक्सिंगचा संशय?

Pakistan Team Crisis: पाकिस्तान क्रिकेट बोर्डा

Jai Jawan Govinda Pathak : सलग 4 वेळा प्रयत्न, तरीही जय जवान अपयशी! यंदा दहीहंडीत नक्की काय बिनसले?

 मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून मुंबई आणि ठाण्यात गोविंदा पथकांनी उंच मानवी