Nasarapur case : नसरापूर प्रकरणात आरोपीचा संतापजनक जबाब, 'घटनेच्या दिवशी मी...'

Nasarapur case : पुण्याजवळच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये येथे एका ६५ वर्षांच्या नराधमानं चार वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी बलात्कार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणातील आरोपी, ६५ वर्षीय नराधम भीमराव कांबळेला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. पोलीस प्रशासनही या प्रकरणाने खडबडून जागे झाले असून या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. पोलिसांनी गुन्हा करण्यामागचा आरोपीचा हेतू जाणून घेण्यासाठी आरोपीची उलटतपासणी सुरू केली आहे. या उलट तपासणीत आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलिसांना अजब आणि धक्कादायक अशी उत्तरे दिली आहेत. (Nasarapur minor rape case )



आरोपीच्या जबाबाने पोलिसांनाही धक्का


पोलिसांनी भीमराव कांबळेची कसून चौकशी केली असता आरोपीने जे उत्तर दिलं, त्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. “अत्याचार झाला त्या दिवशी मी नशेत होतो,” असं थंड डोक्याने आरोपीने उत्तर दिलं आहे. आरोपीने नशेचा आधार घेत स्वत:चा बचाव करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस प्रशासनाला तो बचावासाठी असे बोलत असल्याचा संशय आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी त्याची कसून चौकशी करत आहेत. (Nasarapur minor rape case )


चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार अन हत्या


शुक्रवारी १ मे रोजी भोर तालुक्यातल्या नसरापूर या ठिकाणी संतापजनक घटना घडली. नराधम ६५ वर्षीय आरोपीने सुट्टीमध्ये मामाच्या गावाला आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा पाठलाग करून तिला वासरं दाखवण्याचा बहाणा करत तिला गोठ्यात नेले. त्याठिकणी तिच्यावर अत्याचार केले. आणि तिची निर्घृण हत्या केली. (Nasarapur minor rape case )कुणाला संशय येऊ नये म्हणून तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला. मुलीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांसोबत तिचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा तिचा मृतदेह सापडला. यानंतर गावात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तातडीने पोलिसांना पाचारण करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली.



त्याला तसाच ठेचून मारला पाहिजे – आरोपीची पत्नी


नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीच्या वृद्ध पत्नीने या घटनेवर व आपल्या पतीवर संताप व्यक्त केला आहे. गेल्या १० वर्षांपासून आपला त्याच्याशी संपर्क नसल्याचंदेखील नमूद केलं. “त्या बाळाची हत्या झाली त्याच ठिकाणी त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे. मला त्याचं तोंडही बघायचं नाहीये. माझ्यापर्यंत कुणी त्याचा अंत्यविधी झालाय वगैरे सांगायलाही येऊ नये. गेल्या १० वर्षांपासून तो आमच्या संपर्कात नाहीये. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी”, असं त्या म्हणाल्या.“फक्त फाशी नाही, ठेचला पाहिजे त्याला. जिवंत जाळला पाहिजे त्याला. तरीही माझ्या मनाची झालेली आग शांत होणार नाही. त्याचं नाव आमच्या नावाला जोडलंय त्यामुळे आम्हाला लोक जे काही बोलतील ते ऐकून घ्यावं लागेल”, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.


 
Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी