Navnath Ban : मशाल विझवण्याची सुपारी घेणारे संजय राऊत हेच उबाठा गटाचा शेवटचा दिवा विझवणार

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका


मुंबई :  पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपाचा विजय झाल्यानंतर दिवा विझताना मोठा होतो तसा भाजपाचा हा विजय असल्याचे संजय राऊत म्हणत आहेत. मात्र संजय राऊत यांनीच मशाल विझवण्याची सुपारी घेतली असून उबाठाचा शेवटचा दिवा विझवण्याचे काम ते करत असल्याची सणसणीत टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केली. भाजपा हा सुर्य असल्याने जनतेचे आशीर्वाद सोबत आहेत तोपर्यंत भाजपाचा पराभव होणार नसल्याचा विश्वासही बन यांनी व्यक्त केला. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


एखाद्याला नोकरीवरून काढून टाकल्यावर मी राजीनामा देणार नाही, या भूमिकेला काही अर्थ नसतो. जनतेने तुम्हाला पश्चिम बंगालमधून काढून टाकल्याने तुम्ही राजीनामा दिला काय, नाही दिला काय. पराभव स्वीकारला का किंवा नाही स्वीकारला, याने काहीही फरक पडत नाही. लोकांचा आदर करणे हे ममता बॅनर्जींनी कधीच केले नाही. जनमताचा कधीही सन्मान राखला नाही. त्यामुळे ममता बॅनर्जींची ही भूमिका काही नवी नाही. पंधरा वर्षे ममता दीदींनी पश्चिम बंगालमध्ये दादागिरी केली. आता जनतेने नाकारल्यानंतरही त्यांची दादागिरी सुरू आहे. पण संजय राऊत त्याचे समर्थन करताहेत. संजय राऊत, तुम्ही ममता दीदींच्या या आंदोलनात थेट पश्चिम बंगालमध्ये जाऊन सहभागी व्हा आणि त्यांना पाठिंबा द्या, असे बन यांनी सुनावले.




बन म्हणाले की भाजपा जनतेच्या जीवावर निवडून येते, जनतेची सेवा करते आणि मग निवडणूक जिंकते. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याप्रमाणे घरात बसण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचा कोणताही नेता करत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रीपद गेले होते तेव्हा विधान परिषदेचा राजीनामा देईन, असे उद्धव ठाकरेंनी  सांगितले होते. परंतु त्यांनी तो शब्द पाळला नाही. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर चार वर्षे राजीनामा दिला नाही. मात्र उद्धव ठाकरे घरी बसले. ममता दीदी आता विधानसभेमध्ये जाऊही शकत नाहीत. कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झालेला नाही, असे बन म्हणाले.



भोरमध्ये एका चिमुकलीवर अन्याय झाला. अतिशय अमानवी कृत्य केले. त्या प्रकरणामध्ये सरकार सजग आहे. पूर्णपणे कारवाई करून त्या आरोपीला तातडीने फासावर लटकवण्याचे काम सरकारच्या माध्यमातून निश्चित केले जाईल. कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. या प्रकरणात तरी किमान राजकारण करू नये. जरांगे पाटील म्हणाले की, ममता बॅनर्जींचा पराभव कधी होऊ शकत नाही. त्यांचा पराभव झाला म्हणजे काहीतरी काळबेरे आहे. जरांगे पाटील यांचे जे कोणी सल्लागार असतील त्यांना मला सांगायचे की किमान जरांगे पाटलांना नीट माहिती द्या, असे  बन म्हणाले.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने