PAK VS IND : कधी होणार भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना ? आली मोठी अपडेट

BCCI UPDATE : भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने बघण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात. स्टेडियम हाऊसफुल होते. टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म या दोन्ही ठिकाणी सामना बघण्यासाठी कोट्यवधी प्रेक्षक येतात. यामुळे मागील काही वर्षांपासून बंद असलेल्या भारत - पाकिस्तान मालिका पुन्हा सुरू होणार का ? यावरून क्रीडाप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने धोरण स्पष्ट केले आहे.


पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाचा पुरस्कार करणे तसेच दहशतवादी कारवायांना प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या मदत करणे थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट मालिकेत भारत खेळणार नाही. पण आयसीसीच्या बहुराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान सहभागी असला तरीही भारत खेळेल. क्रीडा मंत्रालयाने ऑगस्ट २०२५ मध्ये जाहीर केलेले हे धोरण कायम असल्याचे जाहीर केले आहे.



भारताला भविष्यात मोठ्या जागतिक क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवायचे आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय नियम, संकेतांचे पालन करणे आवश्यक आहे. यामुळेच आयसीसीच्या बहुराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान सहभागी असला तरीही भारत खेळेल. पण इतर कोणत्याही स्पर्धेत भारत पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळणार नाही अशी भारताची अधिकृत भूमिका आहे. या भूमिकेत तसूभरही बदल केला नसल्याचा पुनरुच्चार देशाच्या क्रीडा मंत्रालयाच्यावतीने करण्यात आला आहे.


ऑगस्ट २०२५ मध्ये यूएई येथे आशिया कप स्पर्धेत भारत - पाकिस्तान खेळणार की नाही यावरून वाद झाला, त्यावेळी पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत देशाच्या क्रीडा मंत्रालयाने धोरण जाहीर केले. हेच धोरण क्रीडा मंत्रालयाने कायम ठेवले आहे. भारत २०३० च्या राष्ट्रकुल आणि २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठीच आयसीसीच्या स्पर्धेत पाकिस्तान सहभागी असला तरीही खेळू पण इतरत्र पाकिस्तान विरोधात खेळणार नसल्याचे क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले आहे. भारत सरकारच्या या ठाम भूमिकेमुळे सध्या तरी भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिकेची कोणतीही शक्यता नाही, परंतु आयसीसी (ICC) किंवा इतर बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामने पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम