वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, न्युझीलंड विरुद्धची मालिका जिंकूनही 'या' चुकांवर दुर्लक्ष केलं तर...

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे मालिका आपल्या खिशात टाकली आहे. 3-1 ने ही वनडे मालिका जिंकली आहे. वनडे मालिकेनंतर वर्ल्ड कप पूर्वी टीम इंडियाचे काही विक पॉईंट्स आता समोर आले आहेत. ज्यामुळे टीम इंडियाला काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. न्युझीलंडच्या वनडे मालिकेमध्ये, जरीही टीम इंडियाने संपूर्ण मालिका जरीही आपल्या खिशात टाकली असली तरीही टीम इंडियाने काही चुका केल्या आहेत. नेमक्या ह्या कोणत्या चुका केल्या आहेत, जाणून घेऊया...

मुंबई: न्युझीलंडमधील बे ओव्हल या होम ग्राऊंडमध्ये आज, न्युझीलंड विरुद्ध भारत हा सामना रंगला. ह्या शेवटच्या सामन्यामध्ये टीम इंडियाने न्युझीलंडला जिंकण्यासाठी 209 धावांचं आवाहन दिलं होतं. पण, न्युझीलंडने हे आवाहन न पूर्ण करता, 22 रनांनी 187 धावांवर सर्व गडी बाद करत शेवटच्या सामन्यावर आपलं नाव कोरलं. न्युझीलंड विरूद्धच्या सामन्यामध्ये टीम इंडियाने पाच सामन्यांची वनडे मालिका 3-1 अशा फरकाने आपल्या खिशात घेतली. जरीही टीम इंडिया ही पाच सामन्यांची ही वनडे मालिका जिंकली असली तरीही टीम इंडियाकडून काही चुका झाल्या आहेत. नेमक्या ह्या कोणत्या चुका आहेत, जाणून घेऊया...






टीम इंडियामध्ये सर्वाधिक अनुभवी खेळाडू म्हणून रोहित शर्माकडे पाहिले जाते. पण रोहित मात्र, न्युझीलंड विरूद्धच्या वनडे मालिकेमध्ये सपशेल फ्लॉप ठरला. त्याने या सामन्यामध्ये जेमतेम 30 धावाच केल्या आहेत. त्याच्या ह्या असमाधानकारक खेळीमुळे भारतीय क्रिकेट चाहते सहाजिकच त्याच्यावर नाराज आहेत. टीम इंडियाची ही सर्वात पहिली आणि मोठी चुक म्हणता येईल. त्यानंतर, विराट कोहलीच्या खेळीमुळे सुद्धा क्रिकेटप्रेमी त्यावर नाराज आहेत. पहिला सामना वगळता विराटने सुद्धा न्युझीलंड दौऱ्यामधील इतरत्र सामन्यांमध्ये फ्लॉप कामगिरी केली. विराटचे संपूर्ण मालिकेतील एकूण धावा फक्त 86 आहेत.


 


रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे सर्वच क्रिकेट चाहते अनुभवी खेळाडू म्हणून पाहत असताना, इतरत्र खेळाडू त्यांच्या तुलनेमध्ये दमदार खेळी करताना दिसत आहे. ऋतुराज गायकवाड, कॅप्टन श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि नमन धीर यांची दिलासादायक कामगिरी पाहायला मिळत आहे. त्यांच्या दिलासादायक बॅटिंग आणि बॉलिंगमुळे न्युझीलंड सामन्यामध्ये काही प्रमाणातील योगदान ते देताना दिसत आहेत. नव्या दमाच्या खेळाडूंना आता ICC कडून पुढच्या क्रिकेट सामन्यांमध्ये का होईना खेळण्याची संधी दिली जाते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाच्या बॅटिंगच्या तुलनेमध्ये बॉलिंगबद्दल क्रिकेट प्रेमींमधून नाराजीचा सुर उगवताना दिसत आहे.






न्युझीलंड दौऱ्यामध्ये टीम इंडियाची बॉलिंग तितकी स्ट्राँग दिसली नाही. पाचही वनडे सामन्यांपैकी फक्त पाचवा वनडे सामना वगळला तर एकही मॅचमध्ये टीम इंडियाने बॉलर्सच्या बळावर मॅच जिंकली नाही. त्यामुळे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला एकंदरीतच आपल्या संपूर्ण खेळीवर विशेष मेहनत घेणं, फार महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाच्या फिल्डींगबद्दलही प्रश्नचिन्ह उद्भवले जात आहेत. कारण रोहित शर्मा, विराट कोहली सारखे अनुभवी खेळाडू कॅच सोडतायत. वर्ल्ड कपच्या दृष्टीकोणातून ही देखील मोठी समस्या आहे. वर्ल्डकपच्या पूर्वी जर टीम इंडियाने काही या गंभीर चुकांवर आत्ताच उपाय शोधला नाही तर, टीम इंडियाच्या हातातून वर्ल्डकप जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात मोहम्मद सिराज इशान किशनवर भडकला; झेल सुटताच मैदानातच उडाली खळबळ!

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एका रोमांचक सामन्यादरम्यान मैदानात हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला

49 वर्ष उलटली तरीही सचिन तेंडुलकरने जपून ठेवली 'ती' एक गोष्ट! फोटो शेअर करत फॅन्सला केलं थकित

मुंबई: 'मास्टर ब्लास्टर' आणि 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. क्रिकेट

India vs New Zealand: टीम इंडियाचा थरारक विजय! न्यूझीलंडला 22 धावांनी नमवत वनडे मालिका जिंकली

भारत : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवट अत्यंत रोमांचक झाला आहे. मालिकेतील

पाकिस्तानी फॅन्सही ओरडले 'सेहवाग-सेहवाग'! 338 धावांचा थरारक पाठलाग आणि आर्यवीरचा वडिलांना भावनिक व्हिडीओ कॉल, पहा काय घडलं!

Aryavir Sehwag Viral Video : अंडर 19 आशिया कपच्या थरारक अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने पाकिस्तानचा पराभव करत ऐतिहासिक जेतेपद

IND vs NZ 5th ODI : फिल्डिंगचा बादशाह विराट कोहलीकडून मोठी चूक; सोपा झेल सोडताच गौतम गंभीर संतापला...

Virat Kohli dropped catch : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पाचव्या आणि अत्यंत निर्णायक

Lalit Modi British Citizenship: आयपीएलचे संस्थापक ललित मोदी झाले ब्रिटिश नागरिक, ऑक्सफर्ड युनियनमध्ये केली घोषणा

इंडियन प्रीमियर लीगचे संस्थापक ललित मोदी यांनी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले आहे. 15 सप्टेंबर 2026 रोजी