Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटला आयटीएकडून नोटीस ; उत्तेजक चाचणीत अनउपस्थिती....

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला उत्तेजक चाचणी देण्यासाठी गैरहजर राहिल्याप्रकरणी इंटरनॅशन टेस्टिंग एजन्सी (आंतरराष्ट्रीय चाचणी एजन्सी) अर्थात आयटीएकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसला सात दिवसांत उत्तर देणे विनेशसाठी बंधनकारक आहे. विनेशने वर्षभरात केलेली ही पहिली चूक आहे.


नोटीस का दिली आहे ?


नियमांनुसार आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंना नियमितपणे आयटीएची उत्तेजक चाचणी द्यावी लागते. या चाचणीला कोणतेही कारण न देता गैरहजर राहिल्यामुळे आयटीएने विनेश फोगाटला नोटीस बजावली आहे. नियमानुसार वर्षभरात तीन वेळा चाचणीला गैरहजर राहिल्यास संबंधित खेळाडूवर दोन वर्षांची बंदी लागू शकते.


 

विनेशची गेल्यावर्षी १८ डिसेंबरला ६० मिनिटांची चाचणी होणार होती. पण या चाचणीला विनेश गैरहजर राहिली. नोंदणीकृत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंची सकाळी ६ ते रात्री ११ दरम्यान कधीही आयटीएकडून उत्तेजक चाचणी घेतली जाते. या चाचणीला गैरहजर राहिल्यास आयटीएला सबळ कारण द्यावे लागते. विनेशने गैरहजर राहण्याचे कारण देताना हरियाणा विधानसभेच्या अधिवेशनाला उपस्थित होते असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आयटीएने ठोस पुराव्यांसह स्वतःची बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी विनेशला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसला समाधानकारक उत्तर दिले नाही तर विनेश विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम