Chandrashekhar Bawankule And Raj Thackeray : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असले, तरी ही केवळ एक 'सदिच्छा भेट' होती, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.


विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय आणि त्यानंतर मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यात काही वेळा दूरध्वनीवरून चर्चा झाली होती. त्यावेळी राज ठाकरे यांच्याकडे चहा पिण्यासाठी येण्याचे बावनकुळे यांनी कबूल केले होते. त्यानुसार गुरुवारी राज ठाकरे यांनी वेळ दिल्याने ही भेट घेतल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.



राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. मंत्री झाल्यापासून ही भेट प्रलंबित होती. त्यांनी मला चहापानासाठी वेळ दिला आणि आमची अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. त्यांनी माझा यथोचित सन्मान केला. ही भेट पूर्णपणे अनौपचारिक होती.




नेमकी काय चर्चा झाली?

या भेटीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा अन्य कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली का, असे विचारले असता त्यांनी थेट नकार दिला. "आमची मैत्री जुनी आणि अबाधित आहे. एक मित्र म्हणून मी त्यांना भेटायला आलो होतो, यात कोणताही राजकीय अर्थ शोधण्याची गरज नाही," असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण