Jalgaon Crime : दारुड्या पतीला पत्नी कंटाळली, शेवटी पतीचा गळा आवळून हत्या केली

Jalgaon Crime : दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या पतीला अखेर पत्नीनं संपवलं आहे. ही घटना जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावरील केसी पार्क परिसरात घडलीय. भरत नामदेव पाटील (५८, रा. केसी पार्क) असं मयत पतीचे नाव असून पत्नी मनीषा भरत पाटील (५०) असे पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी मनीषा पाटील विरोधात गुन्हा दाखल केला आहे.



दारूच्या व्यसनाने कुटुंबीय त्रस्त


शहरातील कानळदा रस्त्यावरील केसी पार्क परिसरातील भरत पाटील हे पत्नी व दोन मुलांसह राहत होते. त्यांची पत्नी मनीषा एका कापड दुकानात तर दोन मुलं एमआयडीसी कंपनीत कामाला होते. भरत पाटील यांना दारूचे व्यसन होते. दारुच्या नशेत पत्नीसह मुलांना ते नेहमीच त्रास देत होते. वारंवार होत असलेल्या या त्रासाला सर्वच कंटाळले होते. दारू सोडा म्हणून भरत पाटील यांना कुटुंबियांनी अनेकदा समजावले. मात्र भारत पाटील यांचा दारूचा नाद काही सुटत नव्हता. (Jalgaon Crime)



घटनेच्या दिवशी काय घडलं ?


मंगळवारी (५ मे) रात्री ९ वाजता मनिषा पाटील या कामावरुन घरी परतल्या. त्यावेळी पती दारुच्या नशेत घराच्या ओट्यावर बसलेला होता. त्यावेळी देखील त्याने पुन्हा दारुच्या नशेत पत्नीसोबत वाद घातला. बघता बघता वाद टोकाला पोहोचला. मनीषा पाटील यांना संतापत अनावर झाला. संतापाच्या भरात मनिषा पाटील यांनी पती भरत पाटील याचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळला व पलंगावरून त्यास खाली ओढले. त्या वेळी पतीचे डोके जमिनीवर आपटले गेले कानातून, नाकातून मोठा रक्तस्त्राव झाला.


हे दृश्य पाहताच एका तरुणाने भरत पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांसह पोलिसांनी मयत भरत पाटील यांच्या शरिराची पाहणी केल्यानंतर त्यांच्या मानेवर गळा आवळल्याचे व्रण दिसले. त्यामुळे घातपाताचा संशय बळावला. सुरुवातीला या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी दुपारच्या सुमारास भरत पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावरुन भरत पाटील यांचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. (Jalgaon Crime)


मयताच्या पत्नीकडून गुन्ह्याची कबुली


पोलिसी खाक्या दाखवताच संशयित आरोपी मनीषा पाटील हिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. दारुच्या आहारी गेलेल्या पतीकडून वारंवार त्रास दिला जात होता. त्याला कंटाळून संतापाच्या भरात गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या प्रकरणात नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि