- केरळ काँग्रेस मुख्यालयातील धक्कादायक घटना
केरळ : केरळ काँग्रेस मुख्यालयाच्या (Kerala Pradesh Congress Committee) तिरुवनंतपुरम येथील मुख्यालयातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते चेरियन फिलिप (MLA ) यांनी नुकत्याच निवडून आलेल्या कोल्लमच्या आमदार बिंदू कृष्ण (Bindu Krishna) यांना त्यांच्या मनाविरुद्ध मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे, बिंदू कृष्णा या मागे सरकल्यानंतरही चेरियन फिलिप यांनी पुन्हा एकदा मिठी मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चेरियन फिलिप यांच्या या कृतीनंतर बिंदू कृष्णा हात जोडून पुढे निघून जात परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडीओमधून दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
View this post on Instagram
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागल्या असून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नेत्यांच्या वर्तनाबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. महिला नेत्यांबाबत आदरयुक्त आणि संयमी वर्तनाची गरज असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.






