Suryakumar Yadav : आनंदवार्ता! सूर्यकुमार यादवला कन्यारत्न प्राप्त; तब्बल १० वर्षांनंतर आली सूर्याच्या घरी लक्ष्मी

Suryakumar Yadav : भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार आणि मिस्टर ३६० म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांच्या घरी गोंडशी मुलीचे आगमन झाले आहे. या आनंदाच्या बातमीमुळे क्रिकेट चाहत्यांमध्येही अनंदाचे वातावरण आहे.


सध्या सूर्यकुमार यादव आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. मात्र अलीकडेच तो संघासोबत रायपूरला गेला नसल्याची चर्चा होती. आता त्यामागचे कारण समोर आले आहे. पत्नीच्या प्रसूतीमुळे तो मुंबईत कुटुंबासोबत थांबला होता. ही गोड बातमी समोर येताच चाहत्यांनी आणि क्रिकेटविश्वाने या बातमीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.




गुरुवारी सकाळी देविशा शेट्टीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सूर्यकुमार आणि देविशा यांची ओळख कॉलेजपासूनच आहे. दोघांनी २०१६ मध्ये विवाह केला होता. लग्नानंतर तब्बल दहा वर्षांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्या बाळाचे आगमन झाले आहे. सूर्यकुमार अनेकदा आपल्या यशाचे श्रेय पत्नी देविशाला देत आला आहे. कठीण काळात तिने दिलेला आधार त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्याने कितेके मुलाखतीत सागंतले आहे.


दरम्यान, आयपीएल २०२६ मध्ये सूर्यकुमार यादव सध्या अपेक्षित फॉर्ममध्ये दिसत नाही. गेल्या काही महिन्यांपासून त्याला सातत्याने मोठी खेळी करता आलेली नाही. टी-२० विश्वचषकातही त्याने केवळ एका सामन्यात चांगली कामगिरी केली होती.मात्र आता घरात आलेल्या या नव्या पाहुणीच्या आगमनामुळे सूर्यकुमारच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण आहे. या चिमुकलीच्या पायगुणाने त्याला पुन्हा एकदा मैदानावर जुन्या लयीत फलंदाजी करता येईल, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. क्रिकेटविश्वातूनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून