Manoj Bajpayee : मनोज बाजपेयींच्या ‘गव्हर्नर- द सायलेंट सेव्हियर’चा दमदार टीझर आऊट; १९९०च्या आर्थिक संकटाची थरारक कहाणी उलगडणार

मुंबई : मनोज बाजपेयी यांच्या दमदार अभिनयाची आणखी एक झलक प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. विपुल अमृतलाल शाह यांच्या सनशाइन पिक्चर्स प्रस्तुत ‘गव्हर्नर- द सायलेंट सेव्हियर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा दमदार टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल आधीपासूनच प्रचंड उत्सुकता होती आणि आता टीझर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.



मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. पोस्टर पाहूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आता समोर आलेला टीझर अत्यंत प्रभावी, थरारक आणि विचार करायला लावणारा आहे. देशाच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या पण जास्त चर्चेत न आलेल्या घटनेची झलक या टीझरमधून पाहायला मिळते.


या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे. ‘द केरळ स्टोरी’ आणि ‘द केरळ स्टोरी २:गोज बियॉन्ड’ नंतर निर्माते विपुल अमृतलाल शाह आणखी एका सत्य आणि प्रभावी कथेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर हा सिनेमा केवळ मनोरंजन करणारा नसून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा असेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.







‘गव्हर्नर- द सायलेंट सेव्हियर’ हा चित्रपट १९९०च्या दशकात भारताने अनुभवलेल्या मोठ्या आर्थिक संकटावर आधारित आहे. त्या काळात देश गंभीर आर्थिक अडचणीत सापडला होता. या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज बाजपेयी या चित्रपटात आरबीएल अर्थात राष्ट्रीय बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरच्या भूमिकेत दिसणार आहेत. मनोज बाजपेयी यांनी याआधी कधीही न साकारलेली ही भूमिका असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे.


‘गव्हर्नर- द सायलेंट सेव्हियर’ची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली असून आशिम ए.शाह हे सह-निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा सुवेंदु भट्टाचार्जी, सौरभ भारत, रवी असरानी आणि विपुल अमृतलाल शाह यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाला जावेद अख्तर यांची गीतं आणि अमित त्रिवेदी यांचं संगीत लाभलं आहे.


सत्य घटनांवर आधारित, दमदार कथा आणि मनोज बाजपेयी यांच्या प्रभावी अभिनयामुळे ‘गव्हर्नर- द सायलेंट सेव्हियर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार असल्याचं मानलं जात आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट १२ जून २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’