Vijay Thalapathy 'Sarkar' Movie : रील लाईफ ते रिअल लाईफ! विजयच्या सिनेमातील नंबर प्लेटची जोरदार चर्चा

तामिळनाडू :  दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती यांनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर त्यांच्या २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सरकार' (Sarkar) या चित्रपटातील एक सीन पुन्हा चर्चेत आला आहे. या सिनेमातील एका दृश्यात विजय यांच्या गाडीवर ‘TN 07 CM 2026’ अशी नंबर प्लेट दिसते. आता त्यांच्या राजकीय यशानंतर हा सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



अनेक चाहत्यांनी या नंबर प्लेटला ‘आधीच केलेली भविष्यवाणी’ असे म्हटले आहे. “रिल लाईफमध्ये दाखवलेलं आता रिअल लाईफमध्ये खरं ठरलं,” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. काही चाहते विजय यांच्या चित्रपटातील या तपशीलाला दूरदृष्टी मानत आहेत, तर काहींनी हा केवळ योगायोग असल्याचं म्हटलं आहे.


दरम्यान, या व्हायरल क्लिपमुळे पुन्हा एकदा 'सरकार' (Sarkar) चित्रपटाची चर्चा रंगली आहे. सिनेमातील हा छोटासा सीन आता मोठ्या चर्चेचा विषय बनला असून, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.



सध्या सोशल मीडियावर या सीनचे व्हिडीओ आणि स्क्रीनशॉट्स मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. रील लाइफ आणि रिअल लाइफमधील हे अनोखं कनेक्शन सगळ्यांना आश्चर्यचकित करत आहे.

Comments
Add Comment

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार