Nashik TCS Case Nida Khan Arrested : दरवाजा सतत बंद, निदा खान ज्या घरात लपली होती, तिथलं गूढ उलगडलं!

छत्रपती संभाजीनगर :  नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, सक्तीचे धर्मांतर आणि विनयभंग प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि अनेक दिवसांपासून फरार असलेली आरोपी निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला छत्रपती संभाजीनगरमधील कौसर पार्क परिसरातून ताब्यात घेतले. तिच्या अटकेनंतर आता ती ज्या घरात लपून राहत होती, त्या ठिकाणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान ही कौसर पार्क परिसरात नाव बदलून आणि अत्यंत गुप्तपणे राहत होती. पोलिसांना तिच्या वास्तव्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि काल रात्री तिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिला नाशिकमध्ये आणून अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कारवाईनंतर आता एसआयटी (SIT) तपासाला आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


निदा खान ज्या घरात राहत होती, त्या परिसरात मोठ्या प्रमाणात भाडेकरू राहतात. त्यामुळे इथले लोक सहसा एकमेकांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करत नाहीत. याचाच फायदा घेत निदा खान या ठिकाणी राहत असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घर गेल्या सात ते आठ महिन्यांपासून रिकामे होते. घराच्या मूळ मालकाने ते विकल्यानंतर तिथे नक्की कोण राहायला आले, याची कोणालाही माहिती नव्हती.



परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, या घराचा दरवाजा कायम बंद असायचा. घरात नेमकं कोण राहतं, किती लोक आहेत, याबद्दल कुणालाच माहिती नव्हती. मात्र, एक वयस्कर व्यक्ती अधूनमधून घराबाहेर येताना दिसायचा. तो हातात दूध, किराणा किंवा इतर सामान घेऊन घरात जाताना अनेकांनी पाहिला होतं. पण त्या घरात निदा खान लपून बसली आहे, याची कोणालाही कल्पना नव्हती. स्थानिकांच्या मते, हे लोक अवघ्या चार ते पाच दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी राहायला आले असावेत. ते दिवसा आले की रात्री, हेही कोणाला समजले नाही.


दरम्यान, नाशिकच्या टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करणे, त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे, धार्मिक भावना दुखावणे आणि विनयभंग करणे अशा गंभीर आरोपांखाली आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या गंभीरतेमुळे राज्य सरकारने तपासाची जबाबदारी एसआयटीकडे सोपवली आहे. निदा खानच्या अटकेनंतर आता या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास वेगाने सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी