Nashik TCS Case : निदा खानच्या आजच्या पहिल्या सुनावणीत न्यायालयात घडलं ?

Nashik TCS Case : टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली. गेले 25 दिवस निदा खान पोलिसांना गुंगारा देऊन लपली होती. कोर्टाने तिचा जामीन नाकारल्यानंतर अखेर पोलिसांनी तिला शोधून काढले. तिच्यासोबत पाच जणांनाही अटक करण्यात आली आहे. आज पोलिसांच्या मोठ्या सुरक्षततेत तिला कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


टीसीएस (TCS) प्रकरण उघड झाल्यानंतर निदा खानने नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला होता. गर्भवती असल्याचं कारण देत तिने पुन्हा एकदा जमिनासाठी प्रयत्न केला होता, मात्र तिला अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर तिला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


या प्रकरणातील चार आरोपी रजा रफीक मेमन, तौसीफ बिलाल अत्तार, दानिश शेख आणि शाहरुख हुसैन शौकत कुरेशी यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. परंतु या प्रकरणाची मास्टरमाईंड असलेली निदा खान मात्र फरार झाली होती. ती अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर तिला आता छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक गु्न्हे शाखेच्या पोलिसांकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी