Pune Minor Girl Missing Case : पुण्यात चाललंय तरी काय ? अवघ्या ४८ तासांत तब्बल ६ अल्पवयीन मुली रहस्यमयीरीत्या बेपत्ता

पुणे : पुण्यात चाललंय तरी काय ? असाच म्हणायची वेळ आली आहे. पुणे शहर आता अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे हादरून गेले आहे. नुकतेच नसरापूर (Nasrapur) येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच, एका आजोबानेच आपल्या नातीचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या भयंकर घटनांची शाई वाळत नाही तोच, आता आणखी एका बातमीने पुणेकरांची झोप उडवली आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला असून, गेल्या अवघ्या दोन दिवसांत शहरातून तब्बल सहा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. या सर्व मुली १५ ते १७ वर्षे वयोगटातील असून, त्यांना फूस लावून पळवून नेल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.



शहराच्या विविध भागांतून अपहरणाचे सत्र


मुली बेपत्ता होण्याचे हे सत्र शहराच्या वेगवेगळ्या भागांतून उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरे (नऱ्हे) परिसरातून एकाच वेळी दोन अल्पवयीन मुली अचानक दिसेनाशा झाल्या आहेत. त्यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार त्यांच्या हादरलेल्या पालकांनी पोलिसांत दिली आहे. या व्यतिरिक्त, वानवडीसारख्या वर्दळीच्या भागातून एका साडेसतरा वर्षीय तरुणीचे अपहरण झाले आहे, तर हडपसरमधून एका १७ वर्षांच्या मुलीला पळवून नेण्यात आले आहे. हे लोण इथेच थांबले नसून फुरसुंगी आणि वाघोली परिसरातूनही मुली बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.



पालकांमध्ये घबराट आणि पोलिसांची युद्धपातळीवर शोधमोहीम


एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या बेपत्ता सत्रांमुळे पुण्यातील पालकांमध्ये प्रचंड धास्ती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत असून, पोलिसांनी या सर्व प्रकरणांचा तातडीने छडा लावावा अशी आक्रमक मागणी जोर धरत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे अत्यंत वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. या सहाही गुन्ह्यांचा समांतर तपास करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके (Special Teams) तयार करून ती ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. आरोपींचा माग काढण्यासाठी आता मोबाईल लोकेशन आणि सोशल मीडियाचा तांत्रिक आधार घेतला जात आहे.



अत्याचाराची आणखी एक काळी किनार


एकिकडे मुली बेपत्ता होण्याचे सत्र सुरू असतानाच, दुसरीकडे पुणे जिल्ह्यात अत्याचाराची आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथे एका नर्सरीत मजुरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी पाशवी बलात्कार केला. आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजीत खंडागळे अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी गेल्या काही दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होते. घटनेच्या दिवशी त्यांनी क्रूरतेची परिसीमा गाठत, या तरुणीला एका निर्जन स्थळी असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामागे ओढून नेले आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा