Pune Illegal Schools : पालकांनो सावधान! पुणे जिल्ह्यातील तब्बल ४५ शाळा ठरल्या ‘बोगस’; प्रवेशापूर्वी ही यादी एकदा नक्की पाहा

पुणे जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर; काही शाळांकडे मान्यता नाही तर काही शाळा परवानगीशिवाय स्थलांतरित


पुणे : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ (2026-27) सुरू होण्यापूर्वीच पुणे जिल्ह्यातील पालकांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेनंतर आता पुणे जिल्हा परिषदेकडूनही अनधिकृत म्हणजेच ‘बोगस’ शाळांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाभरात एकूण ४५ शाळा बोगस असल्याचे स्पष्ट झाले असून, पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


जिल्हा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण भागात २४ शाळा अनधिकृत आढळल्या आहेत. यापैकी १३ शाळांकडे शासनाची कोणतीही अधिकृत मान्यता नसल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित ११ शाळांकडे मान्यता असली तरी त्या शासनाने मंजूर केलेल्या मूळ ठिकाणाऐवजी इतरत्र हलवून सुरू करण्यात आल्या आहेत. काही शाळांनी तर केवळ ‘इरादा पत्र’ (Letter of Intent) मिळालेले असतानाही पूर्ण मान्यता मिळाल्याचा भास निर्माण करून प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.



याशिवाय पुणे महानगरपालिका हद्दीत १२ शाळा तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ९ शाळा अनधिकृत असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे, मुळशी तालुक्यात सर्वाधिक ९ बोगस शाळा आढळल्याने शिक्षण विभागाची चिंता वाढली आहे.



पुण्यातील बोगस शाळांची यादी :




  • न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, बिबवेवाडी पोलिस स्टेशनजवळ, विमलविहार समोर, चितामणी नगर

  • महात्मा गांधी प्रशाला, प्लॉट नं. ५२, लेन नं. २B, संजय पार्क, येवलेवाडी, पुणे

  • टीएम तखवा इस्लामिक स्कूल अँड मदरसा, स.न. ७०/१/१, NIBM रोड, कोंढवा बु., पुणे – ४११०४८

  • सेंट क्यूटू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बु., पुणे

  • इमॅन्युअल पब्लिक स्कूल, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे – २८

  • आनंदाशा अकॅडमी स्कूल, अजिंक्य डी. वाय. पाटील रोड, लोणीकालभोर, पुणे

  • एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आयर्न पब्लिक स्कूल, मानाजी नगर, नरे, पुणे

  • लेजसी हाय स्कूल, अशोक नगर, कोंढवा बु., पुणे

  • शिवाली नोमानी इंग्लिश मिडीयम स्कूल, अशोक नगर, कोंढवा बु., पुणे

  • ऑलिव्ह व इंटरनॅशनल स्कूल, उंडी, ता. हवेली, पुणे

  • ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल, कोसरवाडी, कोंढवा, पुणे

  • ग्लोबल इंग्लिश मिडीयम School, कोंढवा बु., पुणे

  • आयर्न वर्ल्ड स्कूल, उंडी, पुणे


जिल्हा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या अनधिकृत शाळा : 




  • भोर


-सेंट झेवियर स्कूल




  • हवेली


-ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल




  • इंदापूर


-न्यू लीफ इंग्लिश मीडियम स्कूल


-इरा पब्लिक स्कूल


-अहिल्या इंग्लिश मीडियम स्कूल




  • खेड


-जयश्री इंग्लिश मीडियम स्कूल

-ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल

-ज्ञानज्योत इंग्लिश मीडियम स्कूल

-छत्रपती शिवाजी राजे विद्यालय

-हंपी डंपी फ्री स्कूल

-सरस्वती विद्यालय

  • मुळशी


-एंजल हाय


-क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल


-श्री श्री रविशंकर विद्या मंदिर


-चाणक्य जुनिअर कॉलेज


-सरस्वती क्लासेस


-रोझलँड इंटरनॅशनल स्कूल


-एलीट इंटरनॅशनल स्कूल


-पेरीवेन्कल इंग्लिश मीडियम स्कूल


-श्री विद्या भवन इंग्लिश मीडियम स्कूल




  • मावळ


-जिजस क्राईस्ट इंग्लिश मीडियम स्कूल


-सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल




  • पुरंदर


-श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल




  • शिरूर


- सेंट चावरा स्कूल


पालकांना प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन


जुलै महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने अनेक अनधिकृत शाळा मोठ्या जाहिराती आणि आकर्षक सुविधांचे आमिष दाखवत पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यापूर्वी संबंधित शाळेकडे शासनाचे अधिकृत मान्यता प्रमाणपत्र आहे का, शाळेची नोंदणी वैध आहे का आणि ती मंजूर ठिकाणीच सुरू आहे का, याची खातरजमा करावी, असे आवाहन शिक्षण विभाग आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड