Action by State Govt : बोगस परवाने वाटणाऱ्या विद्युत निरीक्षकाला निलंबनाचा 'शॉक'

राज्य सरकारची कारवाई; प्रत्यक्ष पाहणी न करता सव्वा महिन्यात १ हजार ५८६ उद्वाहनांना परवाने


मुंबई : पुण्यातील आयटी पार्कच्या इमारतीमध्ये उद्वाहनांची (लिफ्ट) प्रत्यक्ष पाहणी न करता आणि अटींची पूर्तता नसतानाही नियमबाह्य पद्धतीने परवाने दिल्याप्रकरणी राज्य शासनाने जळगावचे विद्युत निरीक्षक उदय डांबे यांना निलंबित केले आहे. विशेष म्हणजे, ज्या १८ लिफ्टचे परवाने दिले, त्यातील १० लिफ्टची उभारणी झाली नसतानाही त्या सुरू करण्यास डांबे यांनी संमती दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

उदय डांबे हे दि. ३१ मार्च २०२१ ते ३० जुलै २०२५ या कालावधीत मुंबईत विद्युत निरीक्षक (उद्वाहन) या पदावर कार्यरत होते. या काळात पुण्यातील खराडी येथील 'मे. पंचशील बिझनेस हब' या प्रस्तावित आयटी टॉवरमधील १८ लिफ्टच्या तपासणीची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, डांबे यांनी कोणतीही प्रत्यक्ष पाहणी न करता आणि तपासणीसूचीतील बाबींची पूर्तता न करता या लिफ्टना उभारणी व वापराचे परवाने दिले. यातील १० लिफ्ट तर अस्तित्वातच नसल्याचा धक्कादायक प्रकार चौकशी समितीच्या अहवालातून समोर आला आहे.डांबे यांच्या कार्यपद्धतीवर चौकशी समितीने ताशेरे ओढले आहेत. १९ मार्च ते २७ एप्रिल २०२५ या अवघ्या सव्वा महिन्याच्या काळात त्यांनी तब्बल १ हजार ५८६ लिफ्टची तपासणी स्वतःच केल्याचे दाखवले आहे. एकाच दिवसात त्यांनी कधी २६, तर कधी थेट ८२ लिफ्टची निरीक्षणे केल्याची नोंद आहे. मानवी क्षमतेच्या पलीकडे जाऊन करण्यात आलेली ही घाई संशयास्पद असून १२४ अहवालांवर तर निरीक्षणाची तारीखही नमूद करण्यात आलेली नाही.



पुढील तपास सुरू

लिफ्ट हे जनतेच्या सुरक्षेशी निगडित साधन असल्याने अशा गंभीर नियमांचे उल्लंघन 'महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९' मधील कर्तव्यपरायणतेचा भंग असल्याचे शासनाने म्हटले आहे. या प्रकरणी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने डांबे यांच्या निलंबनाचे आदेश काढले असून, पुढील आदेशापर्यंत त्यांचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे निश्चित करण्यात आले आहे. निलंबन काळात डांबे यांना सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. खासगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास पूर्णतः बंदी असून, असे आढळल्यास निर्वाह भत्ता बंद करून कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

Mumbai Local Train : रेल्वे प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Prakash Abitkar : 'अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबवा'

मुंबई : महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार

BARTI : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित

Goregaon Bus Fire : गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली खासगी बस जळून खाक; धुराच्या लोटांमुळे प्रवाशांची धावपळ

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव परिसरात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. गोरेगाव मेट्रो

Dahi Handi in mumbai local train : धावत्या लोकल ट्रेनमध्येच फोडली दहीहंडी! बदलापूर-ठाणे लोकलमध्ये महिला प्रवाशांचा अनोखा गोपाळकाला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात एका अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाची दृश्ये समोर

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा