Iran - America War : अमेरिका - इराण हल्ल्यात भारतीय जहाज बुडाले: एकाचा मृत्यू

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या ताज्या संघर्षात एका भारतीय मालवाहू जहाजावर गोळीबार झाला. या घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला, तर इतर १७ खलाशांना वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, हा खलाशी गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील जाम सलाया गावचा रहिवासी होता आणि तो दुबईहून येमेनला माल घेऊन जात होता.


मृत खलाशाची ओळख अल्ताफ तलाब केर अशी पटली आहे. 'अल फैज नूर सोलेमानी' या जहाजावर १८ खलाशी असताना गोळीबार झाला, त्यात केर यांचा मृत्यू झाला. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेची पुष्टी केली असून दुःख व्यक्त केले आहे.



महावाणिज्य दूतावासाने एक्सवर लिहिले, " या दुर्दैवी घटनेबद्दल आम्हाला तीव्र दुःख झाले आहे. यामध्ये जहाजावरील एका भारतीय कर्मचाऱ्याचा दुःखद मृत्यू झाला आहे. वाणिज्य दूतावास जहाजाच्या मालकाच्या संपर्कात आहे आणि अधिक माहिती गोळा करत आहे. या प्रकरणात वाणिज्य दूतावास प्राधान्याने सर्वतोपरी मदत करेल."


इंडियन सेलिंग व्हेसल्स असोसिएशनचे सरचिटणीस, आदम भाया यांनी सांगितले की, जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना ही घटना घडली. हल्ल्याच्या वेळी अल्ताफ केर जहाजाच्या इंजिन रूमजवळ होते. जहाजाचे मोठे नुकसान झाले आणि ते बुडू लागले. भाया यांनी सांगितले की, 'प्रेम सागर' नावाचे दुसरे जहाज घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी उर्वरित १७ कर्मचाऱ्यांची सुटका केली. सर्वांना दुबईला आणण्यात आले.



भाया यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, या घटनेमुळे खलाशी समुदाय आणि मृतांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीती आणि दुःख पसरले आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, अशा परिस्थितीत एका निष्पाप भारतीय खलाशाचा मृत्यू होणे ही अत्यंत दुःखद घटना असून, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा