महाराष्ट्राच्या विकासाच्या आलेखाची राष्ट्रीय स्तरावर दखल

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५


'बालस्नेही' आणि 'जलसमृद्धी'मध्ये राज्यातील ग्रामपंचायती देशात प्रथ


नवी दिल्ली : केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५' मध्ये महाराष्ट्राने आपल्या यशाच्या पाऊलखुणा उमटवत राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशभरातील पंचायतींमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दोन महत्त्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या पुरस्कारांचे वितरण ३ जून २०२६ रोजी नवी दिल्ली येथे एका विशेष सोहळ्यात होणार आहे.भंडारा जिल्ह्यातील इटगाव (पु.) ग्रामपंचायतीने 'बालस्नेही पंचायत' (Child-Friendly Panchayat) श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावून १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. ही कामगिरी राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी आणि शिक्षकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, कारण बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव देशासाठी आदर्श ठरले आहे. त्याचप्रमाणे, रायगड जिल्ह्यातील खारीवली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने 'जलसमृद्ध पंचायत' (Water-Sufficient Panchayat) श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत १ कोटी रुपयांचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.




प्रथम क्रमांकासोबतच राज्याने द्वितीय श्रेणीतील पुरस्कारांवरही आपले वर्चस्व राखले आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे (ता. चांदवड) ग्रामपंचायतीने पारदर्शक प्रशासनासाठी 'सुशासन' श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवून ७५ लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले आहे. तसेच, रायगड जिल्ह्यातील चांभारली (ता. खालापूर) ग्रामपंचायतीने 'सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा' या विषयात देशात द्वितीय स्थान मिळवत ३७.५ लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे.हे पुरस्कार 'दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार' (DDUPSVP) आणि 'नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार' (NDSPSVP) अशा दोन प्रमुख श्रेणींमध्ये दिले जातात. गरिबी निर्मूलन, आरोग्य, सुशासन आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या ९ प्रमुख संकल्पनांवर आधारित कामगिरीचे मूल्यमापन 'पंचायत प्रगती निर्देशांक' (PAI 2.0) नुसार करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local Train : रेल्वे प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Prakash Abitkar : 'अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबवा'

मुंबई : महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार

BARTI : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित

Goregaon Bus Fire : गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली खासगी बस जळून खाक; धुराच्या लोटांमुळे प्रवाशांची धावपळ

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव परिसरात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. गोरेगाव मेट्रो

Dahi Handi in mumbai local train : धावत्या लोकल ट्रेनमध्येच फोडली दहीहंडी! बदलापूर-ठाणे लोकलमध्ये महिला प्रवाशांचा अनोखा गोपाळकाला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात एका अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाची दृश्ये समोर

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा