Nashik News : नाशिक शहरात अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरांत विविध विकासकामांना गती प्राप्त झाली आहे. शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी नाशिक महापालिका आणि पोलिस प्रशासनाने (Nashik Municipal Corporation and Police Administration) शनिवारी अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई केली. ही कारवाई आज पहाटेपासून प्रभाग क्रमांक १४ मधील सारडा सर्कल (Sarada Circle Area) ते हॉटेल चित्रकूट परिसरातील अनधिकृत दुकाने आणि टपऱ्यांवर करण्यात आली. या कारवाईत ४० ते ५० पक्की दुकाने व टपऱ्यांवर बुलडोझर चालवून जमीनदोस्त करण्यात आले. (Major action against encroachment)



तर सकाळी आठ वाजेच्या सुमारास द्वारका चौक आणि परिसरात मनपाने मोठ्याप्रमाणात अतिक्रमण मोहीम राबवून अनेक स्टॉल्स, फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करीत अनधिकृत फलकेही हटविली. शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या महामार्गालगतच्या या परिसरात गॅरेज, दुकानदार यांचे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण वाढल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती. (Major action against encroachment)


त्या पार्श्‍वभूमीवर आ. देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी नुकतीच द्वारका परिसराची पाहणी करीत रस्त्यावर अतिक्रमण करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे कालच झालेल्या मनपा स्थायी समितीच्या सभेत अतिक्रमण विषयावर अधिकार्‍यांवर ताशेरे ओढत जोरदार चर्चा झाली. त्या अनुषंगाने ही अतिक्रमण कारवाई करण्यात येत असल्याने या मोहिमेचे महत्त्व अधिक वाढले आहे.



प्रशासनाने (Nashik Municipal Corporation and Police Administration)  नियोजनबद्ध् कारवाई करीत रस्त्याच्या कडेला उभारलेले फेरीवाले, हातगाड्या, तात्पुरते शेड्स तसेच पादचारी मार्ग अडवून ठेवलेले साहित्य हटविण्यात आले. काही ठिकाणी व्यापार्‍यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली, तर उर्वरित ठिकाणी पथकाने कारवाई करत साहित्य जप्त केले. जप्त केलेले साहित्य आडगाव गोदाम येथे जमा करण्यात आले आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, रस्ता रुंदीकरण आणि आगामी सिंहस्थासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ही धडक मोहीम हाती घेतली आहे.


मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या आदेशानुसार पश्‍चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक जाधव, पश्‍चिम गाडी प्रमुख प्रवीण बागुल, सुनील कदम, बापू लांडगे, संजय सूर्यवंशी, जगन्नाथ हमारे, मोहन भांगरे, शुभम खैरनार, दीपक गायकवाड, संतोष पवार आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. आता या भागात अशाच प्रकारे अचानकरीत्या मोहीम राबविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.