Iran - America War : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा युद्धविराम प्रस्ताव फेटाळला; अमेरिका-इराण तणाव पुन्हा पेटणार!

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. युद्धविरामासंदर्भात इराणने अमेरिकेच्या नव्या प्रस्तावाला पाकिस्तानमार्फत उत्तर पाठवले आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव तत्काळ फेटाळून लावत तो “पूर्णपणे अस्वीकार्य” असल्याचे म्हटले. तथापि, प्रस्तावातील कोणत्या बाबींवर अमेरिकेची आक्षेपार्ह भूमिका आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.


इराणने म्हटले आहे की, त्यांना केवळ तात्पुरता नव्हे तर कायमस्वरूपी युद्धविराम हवा आहे. संघर्ष फक्त इराणपुरता मर्यादित न राहता लेबनॉनसह संपूर्ण प्रदेशात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी तेहरानची मागणी आहे. तसेच समुद्री व्यापार आणि तेलपुरवठ्याच्या मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचीही इराणची भूमिका आहे.



अमेरिकेच्या प्रस्तावात युद्ध समाप्त करणे, रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुज सामुद्रधुनीला पुन्हा सुरू करणे आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर मर्यादा आणण्याच्या अटींचा समावेश होता. होर्मुज सामुद्रधुनीला जगातील तेल आणि गॅस पुरवठ्यासाठी सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग मानले जाते.


दरम्यान, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणवर टीका करताना म्हटले की, “तेहरान गेली ४७ वर्षे अमेरिकेसोबत खेळ करत आहे, पण आता ते सहन केले जाणार नाही.” संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेचे राजदूत माइक वॉल्ट्झ यांनी सांगितले की, अमेरिका पुन्हा युद्ध सुरू करण्यापूर्वी राजनैतिक प्रयत्नांना पूर्ण संधी देऊ इच्छिते. दुसरीकडे, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सरकारी माध्यमांनुसार त्यांनी शत्रूंविरोधात “कठोर आणि निर्णायक कारवाई” सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.



याचदरम्यान, खाडी प्रदेशातील ड्रोन हल्ल्यांमुळे तणाव आणखी वाढला आहे. कतारजवळ एका जहाजाला ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली, तर संयुक्त अरब अमिराती आणि कुवेत यांनी आपल्या हवाई क्षेत्रात संशयास्पद ड्रोन दिसल्याचे सांगितले. यूएईने दावा केला की त्यांनी दोन ड्रोन पाडले असून त्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. मात्र या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कतारने जहाजावरील हल्ला अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले असून त्यामुळे समुद्री व्यापार आणि आवश्यक पुरवठ्यावर धोका निर्माण झाल्याचे सांगितले आहे.


कुवेतच्या लष्करानेही ड्रोन हालचालींची पुष्टी केली, पण ते कुठून आले याबाबत माहिती दिली नाही. युद्धकाळात इराण आणि त्याच्या सहयोगी संघटना हिजबुल्ला यांच्याकडून सातत्याने ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. हा संघर्ष फेब्रुवारी महिन्यात अमेरिका आणि इस्रायल यांच्या संयुक्त हल्ल्यांनंतर सुरू झाला होता. इराणने असेही स्पष्ट केले आहे की, त्यांच्या अणुठिकाणांच्या सुरक्षेसाठी लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी दावा केला की, परदेशी शक्ती घुसखोरी किंवा हेलिकॉप्टर मोहिमेद्वारे समृद्ध युरेनियम चोरण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी त्यांना भीती आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थाच्या माहितीनुसार, इराणकडे ६० टक्क्यांपर्यंत समृद्ध केलेले ४४० किलोहून अधिक युरेनियम आहे, जे अण्वस्त्रनिर्मितीच्या क्षमतेच्या जवळ मानले जाते.



इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले की, इराणमधून समृद्ध युरेनियम बाहेर काढले जात नाही तोपर्यंत युद्ध पूर्णपणे संपल्याचे मानता येणार नाही. त्यांनी दावा केला की, ट्रम्पही या दिशेने कारवाई करण्याच्या बाजूने आहेत. दरम्यान, व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, रशिया अजूनही इराणचे समृद्ध युरेनियम आपल्या ताब्यात ठेवण्याच्या प्रस्तावावर ठाम आहे, जेणेकरून तोडग्याचा मार्ग निघू शकेल. युद्ध संपल्यानंतर होर्मुज सामुद्रधुनीत आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा मोहीम राबवण्याच्या फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या योजनेवरून आणखी एक मोठा वाद निर्माण झाला आहे.


इराणने इशारा दिला आहे की, कोणत्याही परदेशी देशाच्या जहाजांनी अमेरिकेच्या कारवाईत सहकार्य केल्यास त्याला तात्काळ आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले की, ही कोणतीही लष्करी तैनाती नसून समुद्री व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठीची आंतरराष्ट्रीय मोहीम असेल.गेल्या आठवडाभरात फारसची खाडी परिसरातील अनेक जहाजांवर हल्ले झाले आहेत. दक्षिण कोरियानेही खुलासा केला की, त्यांचे एक मालवाहू जहाज होर्मुज सामुद्रधुनीत स्फोट आणि आगीच्या विळख्यात सापडले होते. मात्र या हल्ल्यांमागे नेमके कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.