Nashik : टायर फुटल्याने लक्झरी बसचा भीषण अपघात; एक ठार, ७ गंभीर

Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) येथील हॉटेल निकिताजवळ भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचे टायर अचानक फुटल्याने हा अपघात घडला असून यात एक जण ठार तर ७ गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली.


मालेगावकडून नाशिककडे जाणारी ही बस मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Aagra Highway) उलटल्याने झालेल्या या अपघातात ६० वर्षीय राजेंद्र अमरसिंग सोळुंकी हे ठार झाले. तर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, २० जण किरकोळ जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या शांततेत बसचा टायर फुटल्याचा प्रचंड आवाज आणि त्यानंतर प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता. (Chandwad Accident News)



मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त लक्झरी बस (क्र. एमएच १८ बीजी ४००५) ही मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जात होती. अचानक टायर फुटल्याने बस दुभाजकालगत उलटल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. अपघाताची माहिती मिळताच, हायवे रुग्णवाहिका, पेट्रोलिंग टीम, तसेच स्थानिक पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले (Accident News) आणि जखमींना तातडीने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Chandwad Accident News)


अपघातातील जखमींवर सध्या प्राथमिक उपचार सुरू असून, काहींना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात (Hospital) हलविण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. हायवे रिकव्हरी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. (Chandwad Accident News)



अपघातातील जखमी प्रवासी


प्राथमिक माहितीनुसार या अपघातात  मयूर सूर्यभान जाधव (रा. चांदवड), मेघश्याम सुनील दंगल (रा. सटाणा), शोभा विजय बिरारी (रा. रावळगाव), पंकज मनोहरसिंग पाटील (रा. पुणे), नितीन वामन कुऱ्हाडे (रा. वणी), विजय तुळशीराम बिरारी (रा. रावळगाव), दर्शन भगवान पाटील (रा. पुणे), मिथुन तापीराम गिल (रा. आरवी), जयश्री चंद्रकांत पाटील (रा. आरवी), संगीता भगवान पाटील (रा. चुंबाळे), देवयानी पंकज पाटील, कल्पना अशोक चिले (रा. आरवी), तुषार तापीराम गिल (रा. पुणे), निंबा शिवाजी पाटील (रा. वणी, धुळे), भूषण ताराचंद पाटील (रा. चोपडे), वंदना दिला चव्हाण (रा. पुणे), रेखा करण सोनवणे (रा. सांगवी), अरबाज भिका मेहलाल (रा. शिरपूर) हे अपघातात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण