Real Madrid vs Barcelona : एल-क्लासिकोमध्ये बार्सिलोना अजिंक्य; रिअल माद्रिदचा 2-0 ने पराभव करत 29व्यांदा जिंकले ला लिगा विजेतेपद

LaLiga : स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगाच्या विजेतेपदासाठी झालेल्या एल-क्लासिको सामन्यात एफसी बार्सिलोनाने (FC Barcelona) रिअल माद्रिद सीएफवर (Real Madrid CF) 2-0 असा शानदार विजय मिळवत 29व्यांदा लीगचे विजेतेपद पटकावले. या महत्त्वाच्या सामन्यात मार्कस रशफोर्ड (Marcus Rashford) आणि फेरान टोरेस (Ferran Torres) यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.सामन्यापूर्वी गुणतालिकेत एफसी बार्सिलोना (FC Barcelona) आणि रिअल माद्रिद सीएफ (Real Madrid CF) यांच्यात तब्बल 11 गुणांचा फरक होता. हंगामाच्या सुरुवातीला रिअल माद्रिदने चांगली कामगिरी केली होती, मात्र मधल्या टप्प्यात काही सोपे सामने गमावल्यामुळे त्यांना पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरावे लागले होते.पण अंतिम सामन्यात एफसी बार्सिलोनाने कमाल केली. त्यांनी घरच्या मैदानावर कॅम्प नोऊ (Camp Nou) येथे खेळवण्यात आला. या विजयासह बार्सिलोनाने ला लिगाच्या इतिहासात 29व्यांदा विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला.


घरच्या मैदानावर बार्सिलोना अपराजित


प्रशिक्षक हॅन्सी फ्लिक (Hansi Flick) यांच्या मार्गदर्शनाखाली या हंगामात बार्सिलोना घरच्या मैदानावर अपराजित राहिला आहे. या हंगामात बार्सिलोनाने कॅम्प नोऊ (Camp Nou) येथे एकूण 18 सामने खेळले असून त्यातील एकही सामना गमावलेला नाही. तसेच संघ मागील 11 सामन्यांपासून अपराजित आहे.



रिअल माद्रिदच्या अडचणी वाढल्या


रिअल माद्रिद सीएफ (Real Madrid CF) सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. या पराभवामुळे संघावर आणखी दबाव वाढला आहे. प्रशिक्षक अल्वारो अल्बेरो (Álvaro Arbeloa) यांच्या मार्गदर्शनाखाली संघ अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. संघातील अंतर्गत वातावरणही तणावपूर्ण असल्याची चर्चा आहे.सामन्याच्या काही दिवसांपूर्वी अॅरोलिन टॉक्युमिनी (Aurélien Tchouaméni) आणि फ्रेडरिको व्हेलवर्दे (Federico Valverde) यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेत व्हेलवर्देला दुखापत झाल्याने तो या सामन्यात खेळू शकला नाही. संपूर्ण 90 मिनिटांत रिअल माद्रिदला केवळ एकच शॉट लक्ष्यावर मारता आला. त्यामुळे या हंगामातील हा त्यांचा सर्वात खराब सामना ठरला.


ला लिगा 2025-26 हंगामाचा शेवट


स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगा (La Liga) चा 2025-26 हंगाम एफसी बार्सिलोनाने (FC Barcelona) जिंकला. या हंगामात बार्सिलोनाने 35 पैकी 30 सामने जिंकले, एक बरोबरीत सुटला तर चार सामने गमावले. संघाने 91 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले.दरम्यान क्यालियन मबंप्पे (Kylian Mbappeé) हा या हंगामातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. त्याने रिअल माद्रिद सीएफसाठी (Real Madrid CF) 28 सामन्यांत 24 गोल केले. तर सर्वाधिक असिस्ट बार्सिलोनाच्या लॅमिन यामालने (Lamine Yamal) केले असून त्याच्या नावावर 11 असिस्ट आहेत.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून