Meghna Sakore Bordikar : 'राज्य कामगार विमा योजनेच्या सेवा अधिक सक्षम करा'

मुंबई : राज्यातील कामगारांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य कामगार विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. निर्मल भवन येथील एमएसआरटीसी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी राज्य कामगार विमा योजनेचा सविस्तर आढावा घेतला.



बैठकीत योजनेअंतर्गत नोंदणीकृत सदस्यांची संख्या, सदस्यांकडून प्राप्त होणारी वर्गणी, विमा योजनेअंतर्गत कार्यरत असलेले दवाखाने, नवीन दवाखाने सुरू करण्याबाबतची स्थिती तसेच राज्यातील कामगारांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या रुग्णशय्यांची माहिती याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.



राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी कामगारांना आरोग्य सुविधा वेळेत आणि गुणवत्तापूर्ण मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून, विमा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रुग्णालये व दवाखान्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या सूचना दिल्या. औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाढत्या गरजा लक्षात घेऊन नवीन दवाखाने सुरू करण्याच्या प्रस्तावांवरही त्यांनी चर्चा केली.



कामगार विमा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या रुग्णशय्या, उपचार सुविधा, वैद्यकीय मनुष्यबळ आणि औषध उपलब्धता याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर