गोरगरीब, गरजू रुगांसाठी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये 37 रूग्णखाटा राखीव

महानगरपालिका आणि ग्लोबल हॉस्पिटल यांच्यात महापौरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार सामंजस्य करार ; अतिदक्षता सेवा, आपत्कालीन उपचार, डायलिसिस तसेच आवश्यक अतिविशेषोपचार सुविधांचा समावेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महानगरपालिका आणि परळ येथील ग्लोबल हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये एकूण २४५ रूग्णशय्या असून, त्यापैकी १५ टक्के म्हणजेच ३७ रूग्णशय्या महानगरपालिकेने नामनिर्देशित केलेल्या पात्र रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची व्यवस्था या करारातून कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे या रुग्णखाटा महापालिका रुग्णांसाठी राखीव ठेवल्या जाव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी बैठका आणि पुरावा केल्यानंतर अखेर याला यश आले आहे.


मुंबई महानगरपालिका आणि परळ येथील ग्लोबल हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्याच्या अधिकाराला अधिक बळकटी मिळणार असून सार्वजनिक हिताचे संरक्षण होणार आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या निर्णयक्षमतेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा महत्वपूर्ण उपक्रम आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले. भूतकाळातील प्रलंबित दावे आणि महानगरपालिकेचे कायदेशीर अधिकार अबाधित ठेवून भविष्यातील रुग्णसेवेचा मार्ग खुला करणे, हे या सामंजस्य कराराचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.


ग्लोबल हॉस्पिटलमध्ये एकूण २४५ रूग्णशय्या असून, त्यापैकी १५ टक्के म्हणजेच ३७ रूग्णशय्या महानगरपालिकेने नामनिर्देशित केलेल्या पात्र रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची व्यवस्था या करारातून कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये सामान्य रुग्णशय्या, अतिदक्षता सेवा, आपत्कालीन उपचार, डायलिसिस तसेच आवश्यक अतिविशेषोपचार सुविधांचा समावेश आहे. या व्यवस्थेमुळे पात्र रुग्णांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांशी निगडित निर्धारित सवलतीच्या दरांच्या आधारे अत्याधुनिक खासगी रुग्णालयात उपचार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.






या व्यवस्थेच्या अंमलबजावणीमध्ये राजे एडवर्ड स्मारक (के.ई.एम.) रुग्णालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. पात्र रुग्णांची निवड, वैद्यकीय आवश्यकतेचे परीक्षण आणि रुग्णांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये संदर्भित करण्याची प्रक्रिया के.ई.एम. रुग्णालय अधिष्ठात्यांच्या माध्यमातून राबविण्यात येईल. यामुळे पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि रुग्णहित यांना प्राधान्य देणारी व्यवस्था निर्माण होईल, असेही महापौर म्हणाल्या.


सार्वजनिक आणि खासगी आरोग्य व्यवस्था या परस्परांच्या प्रतिस्पर्धी नसून, योग्य नियोजन आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून एकमेकांच्या पूरक ठरू शकतात. खासगी रुग्णालयांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अतिविशेषोपचारांची क्षमता आहे, तर महानगरपालिकेकडे व्यापक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि गरजू रुग्णांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा आहे. या दोन्हींचा योग्य समन्वय साधला, तर मुंबईतील आरोग्यसेवेची उपलब्धता आणि परिणामकारकता निश्चितच वाढू शकते, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले. कराराची प्रभावी अंमलबजावणी झाल्यानंतर अशा प्रकारची व्यवस्था इतर पात्र खासगी रुग्णालयांमध्येही विकसित करण्यासाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरू शकेल. म्हणूनच या कराराच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवणे, राखीव खाटा प्रत्यक्ष उपलब्ध होणे, रुग्णांना उपचारांसाठी अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये आणि उपचारांच्या दरांमध्ये पारदर्शकता राहावी, याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज महापौर तावडे यांनी व्यक्त केली आहे

Comments
Add Comment

विसर्जित पीओपीच्या गणेश मूर्तींवर प्रक्रिया करण्यास महापालिकेला सापडेना मुहूर्त

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवामध्ये विसर्जित होणाऱ्या पीओपींच्या मूर्तींवर प्रक्रिया

BMC : रुग्णालयातील औषधे आणि वैद्यकीय साहित्यांच्या उपलब्धतेबाबत नागरिकांसाठी व्हॉट्सअप कार्यालय?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक आरोग्य समिति, अध्यक्षांच्या कार्यालयात

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर यांच्या 25 बॅट्सचा अनोखा संग्रह; वानखेडे स्टेडियमवर ‘बॅटोग्राफी’ दालनाचे अनावरण

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या कारकिर्दीतील खास आठवणी आता चाहत्यांना

सचिनच्या आठवणींचा खजिना वानखेडेत! 26 ऐतिहासिक बॅट्स पाहण्याची संधी; 'बॅटोग्राफी' प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील अविस्मरणीय आठवणींचा

Lokparampara Mahotsav: लोककलेच्या रंगाविष्काराने गिरगावात रंगला ‘लोकपरंपरा महोत्सव’!

मुंबई( सुहास शेलार): महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा, लोककलेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा सुरेख आविष्कार

Ravi Dubey Ramayana : "माझा अजूनही विश्वास बसत नाहीये..."; 'रामायण'मधील लक्ष्मणच्या भूमिकेनंतर अभिनेता रवी दुबे भावुक!

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रामायण' या भव्य चित्रपटात प्रभू श्रीरामांचे लहान बंधू लक्ष्मण यांची भूमिका