BMC : आरोग्यांच्या मुद्दयावर शिवसेना आक्रमक, महापौरांकडे केली आरोग्य समस्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष सभेची मागणी

या गंभीर प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल तातडीने महानगरपालिकेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत सादर करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या अथवा प्रस्तावित कारवाईची माहिती देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील बंद लिफ्टसंदर्भात शिवसेना आक्रमक झाली असून या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सर्वपक्षीय गटनेत्यांसमोर सादर करण्यात यावा आणि मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात महानगरपालिकेची विशेष सभा आयोजित करण्याची मागणी शिवसेनेच्या गटनेत्यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे.


शिवसेनेचे महापालिका गटनेते अमेय घोले यांनी महापौरांना लिहिलेल्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील केईएम रुग्णालयातील लिफ्ट अनेक दिवस बंद आहे. त्यामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल तातडीने महानगरपालिकेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत सादर करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या अथवा प्रस्तावित कारवाईची माहिती देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली.






तसेच मुंबईतील महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये व आरोग्य केंद्रांमध्ये अपुऱ्या सुविधा, बंद लिफ्ट, वैद्यकीय उपकरणांची कमतरता, मनुष्यबळाचा अभाव, रुग्णालयांच्या इमारतींची दुरवस्था आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाची आवश्यकता अशा अनेक गंभीर समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर २०२६ महिन्यात महानगरपालिकेची एक विशेष सभा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


या विशेष सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील आरोग्यविषयक समस्या मांडण्याची पुरेशी संधी देण्यात यावी. तसेच संबंधित वरिष्ठ आरोग्य अधिकारी व रुग्णालय प्रशासनाने उपस्थित राहून नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. सभेत मांडण्यात आलेल्या समस्यांवर कालमयदित उपाययोजना करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सुरक्षित व सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही विनंती केली आहे.

Comments
Add Comment

गोरगरीब, गरजू रुगांसाठी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये 37 रूग्णखाटा राखीव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका आणि परळ येथील ग्लोबल हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार

विसर्जित पीओपीच्या गणेश मूर्तींवर प्रक्रिया करण्यास महापालिकेला सापडेना मुहूर्त

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवामध्ये विसर्जित होणाऱ्या पीओपींच्या मूर्तींवर प्रक्रिया

BMC : रुग्णालयातील औषधे आणि वैद्यकीय साहित्यांच्या उपलब्धतेबाबत नागरिकांसाठी व्हॉट्सअप कार्यालय?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक आरोग्य समिति, अध्यक्षांच्या कार्यालयात

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर यांच्या 25 बॅट्सचा अनोखा संग्रह; वानखेडे स्टेडियमवर ‘बॅटोग्राफी’ दालनाचे अनावरण

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या कारकिर्दीतील खास आठवणी आता चाहत्यांना

सचिनच्या आठवणींचा खजिना वानखेडेत! 26 ऐतिहासिक बॅट्स पाहण्याची संधी; 'बॅटोग्राफी' प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील अविस्मरणीय आठवणींचा

Lokparampara Mahotsav: लोककलेच्या रंगाविष्काराने गिरगावात रंगला ‘लोकपरंपरा महोत्सव’!

मुंबई( सुहास शेलार): महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा, लोककलेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा सुरेख आविष्कार