Sunil Gavasakar : IPL Final या दोन टीममध्येच रंगणार, गावस्करांची भविष्यवाणी

IPL 2026 FINAL PREDICATION : आयपीएल २०२६ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात साखळी सामना होत आहे. हा यंदाच्या हंगामातील ५५ वा साखळी सामना आहे. पंजाबने हंगामाची सुरुवात दमदार केली होती. मात्र मागील तीन सामन्यांत त्यांचा पराभव झाला तरी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी पंजाबच्या संघावर विश्वास व्यक्त केला आहे. यंदा आयपीएल फायनल ही पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात होईल; असे भाकीत गावस्करांनी केले आहे.


नेमकं काय म्हणाले सुनील गावस्कर?


स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना गावस्कर म्हणाले की, काही वेळा पराभव संघासाठी उपयोगाचा ठरतो. पराभवामुळे संघाला पुन्हा एकत्र येण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळते.



पंजाब किंग्सची कामगिरी


पंजाब सध्या १३ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. या हंगामातील पहिल्या सात सामन्यांमध्ये संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यापैकी सहा सामने त्यांनी जिंकले, तर केकेआर विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. पंजाबला या हंगामातील पहिला पराभव राजस्थान विरुद्ध पत्करावा लागला. त्यानंतर गुजरात आणि हैदराबाद या संघांविरुद्धही त्यांना सलग पराभवांचा सामना करावा लागला.


अंतिम सामन्याबाबत गावस्करांचा विश्वास


'सलग तीन पराभव झाले असले तरी पंजाब किंग्स अंतिम सामन्यापर्यंत मजल मारेल. काही वेळा पराभव संघासाठी फायदेशीरही ठरू शकतो. त्यामुळे संघाला पुन्हा एकत्र येण्याची आणि नव्याने नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळते. तसेच त्यांनी सांगितले की, स्पर्धेच्या या निर्णायक टप्प्याचे महत्त्व पंजाबला नक्कीच समजले असेल आणि आणखी एक पराभव टाळण्यासाठी संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. दिल्लीलाही विजयाची नितांत गरज आहे. त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी दिसलेली नाही. मात्र मला अजूनही ठामपणे वाटते की, यंदाचा आयपीएलचा अंतिम सामना पंजाब आणि आरसीबी यांच्यातच होईल'; असे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) - ११ सामने - ७ विजय - १४ गुण
पंजाब किंग्स - १० सामने - ७६ विजय - १ पावसामुळे रद्द - १३ गुण

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून