Team India : टी २० पाठोपाठ वनडेमध्येही टीम इंडिया नंबर १!

मुंबई : भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम राखले आहे. वार्षिक अपडेटनंतरही भारतीय संघ जगातील एकदिवसीय संघांच्या यादीत अव्वलस्थानी कायम राहिला आहे, परंतु यावेळी आघाडीचे अंतर किंचित कमी झाली आहे. दुसऱ्या स्थानावर असलेला न्यूझीलंड आता भारतापेक्षा केवळ पाच रेटिंग गुणांनी मागे आहे, ज्यामुळे येत्या काही महिन्यांत अव्वल स्थानासाठीची लढत अधिक रोमांचक होणार आहे.



ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय संघाकडे ११८ रेटिंग गुण आहेत. भारतीय संघाने एक रेटिंग गुण गमावला आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडकडे ११३ गुण आहेत, तर विश्वविजेता ऑस्ट्रेलिया १०९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकत मोठी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिका आता १०२ गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचली आहे, तर पाकिस्तान ९८ गुणांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. श्रीलंका ९६ गुणांसह सहाव्या, अफगाणिस्तान (९३ गुण) सातव्या, इंग्लंड (८९ गुण) आठव्या, बांगलादेश (८४ गुण) नवव्या आणि वेस्ट इंडिज (७४ गुण) दहाव्या स्थानावर आहे. ताज्या क्रमवारीत, आयर्लंडने झिम्बाब्वेला मागे टाकत ११ वे स्थान पटकावले आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका १३ व्या स्थानावर पोहोचला आहे, तर संयुक्त अरब अमिरातीने कॅनडाला मागे टाकत १९ वे स्थान मिळवले आहे.



क्रमवारी विश्वचषकासाठी महत्त्वाची : ही क्रमवारी आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२७ साठीच्या थेट पात्रतेशी जोडलेली आहे. ३१ मार्च २०२७ पर्यंतच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल आठमध्ये असलेले संघ आगामी विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील. यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांनी आधीच थेट प्रवेश निश्चित केला आहे. जर दक्षिण आफ्रिका अव्वल आठमध्ये कायम राहिली, तर नवव्या स्थानावरील संघालाही विश्वचषकात थेट स्थान मिळवण्याची अधिक संधी मिळेल.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात