Ashok Kharat : खरातच्या बायकोची अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी, कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Ashok Kharat : शहरातील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणाने पुन्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) यांच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली, मात्र न्यायालयाने त्यांना कोणताही तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता मे महिन्याच्या अखेरीस ढकलण्यात आली आहे.


कल्पना खरात यांनी अटकेच्या भीतीने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने आजच्या सुनावणीत खरात यांना दिलासा देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ ते ३० मे दरम्यान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तोपर्यंत कल्पना खरात (Kalpana Kharat) यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम राहणार आहे.


सुनावणी दरम्यान, खरात यांच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी काही जुन्या निकालांचे संदर्भ (Case References) देण्याचा प्रयत्न केला. कायदेशीर पळवाटा आणि पूर्वीच्या काही सारख्या प्रकरणांमधील न्यायालयाच्या निर्णयांचा आधार घेत जामीन मिळवण्यासाठी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. परंतु, न्यायालयाने हे संदर्भ ग्राह्य धरले नाहीत आणि तूर्तास जामीन अर्जावरील पुढील प्रक्रिया स्थगित ठेवली.



दरम्यान, रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) देखील अशोक खरात प्रकरणात अडकल्या आहेत. चाकणकर यांची दोन दिवसांपूर्वीच विशेष तपास पथकाद्वारे (SIT) साडेपाच तास चौकशी करण्यात आली होती. आता या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) उडी घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने रुपाली चाकणकर यांना समन्स बजावले असून लवकरच त्यांची चौकशी केली जाणार आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचारासोबत अशोक खरात याने एक मोठे खंडणी रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. या रॅकेटच्या माध्यमातून त्याने ७० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केल्याचा संशय आहे. ही मोठी रक्कम वळवण्यासाठी त्याने अनेक बेनामी बँक खाती वापरली होती.


आता या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव समोर आले आहे. आता त्यांचा या आर्थिक व्यवहारांशी काही संबंध आहे का, याचा तपास यंत्रणा करत आहेत.त्यासाठी त्याची चौकशी होणार आहे. SIT आपला चौकशी अहवाल लवकरच ईडीला सादर करणार आहे. जर या चौकशीत ठोस पुरावे सापडले, तर रूपाली चाकणकर यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. ऐन राजकीय घडामोडींच्या काळात केंद्रीय यंत्रणेने या प्रकरणात प्रवेश केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.