IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफची शर्यत वाढली, कोणत्या संघाला किती गुण पाहिजेत , जाणून घेऊया...

PlayOff Race : आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफची शर्यत वाढली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ५५ सामने झाले आहेत. अद्याप एकही संघ प्लेऑसाठी पात्र झाला नाही. आज (मंगळवार १२ मे २०२६) ५६ वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकणारी टीम ही आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफसाठी पात्र होणारी पहिली टीम असेल. टॉप चार स्पॉटसाठी जोरदार लढत होत आहे. मात्र लखनऊ आणि मुंबई या दोन टीमचे प्लेऑफचे आव्हान संपुष्टात आले आहे.



आज गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा सामना रंगणार आहे. प्लेऑफच्या पात्रतेसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ प्लेऑफसाठी कोणत्या संघाला किती गुणांची गरज आहे ? आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ५५ साखळी सामना झाले आहेत, तर २४ मे ला अखेरचा ७० वा साखळी सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या प्लेऑफची सुरुवात २६ मे पासून होणार आहे. यामुळे सामने आणखी रंगतदार होत आहेत. आता कोणत्या संघाला किती सामने जिंकण्याची आवश्यकता आहे ते जाणून घेऊया...


 



 

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू : रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. संघाने ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. ते १४ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत. आरसीबीला राहिलेल्या तीन सामन्यात फक्त एक सामना जिंकण्याची गरज आहे.


सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्सच्या नेतृत्वात हैदराबादने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. यात संघाने ७ सामने जिंकले आहेत. हैदराबादला प्लेऑफकरिता पात्र होण्यासाठी उर्वरित तीन सामन्यात एक सामना जिंकण्याची गरज आहे. सध्या हैदराबाद गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.


गुजरात टायटन्स : यंदाच्या हंगामात गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल करीत आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने ११ पैकी सात जिंकले आहेत आणि १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. उरलेल्या तीन सामन्यात गुजरातला एक सामना जिंकण्याची गरज आहे.


पंजाब किंग्स : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबने हंगामाची सुरुवात चांगली केली होती. मात्र सलग चार पराभवांनंतर पंजाब अडचणीत आहे. पंजाबने ११ पैकी सहा सामने जिंकले आहेत. पंजाबला उरलेल्या तीन पैकी दोन सामने जिंकण्याची गरज आहे. पंजाब सध्या गुणतालिकेत १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.


चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात सीएसकेने हंगामाची सुरुवात निराशाजनक केली होती, मात्र संघाने हंगामात पुनरागमन केले आहे. सीएसकेने ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत. संघ १२ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. उरलेल्या तीन पैकी सीएसकेला दोन सामने जिंकण्याची गरज आहे.


राजस्थान रॉयल्स : रियान परागच्या नेतृत्वात राजस्थानने आतापर्यंत ११ पैकी सहा सामने जिंकले आहेत. राजस्थान १२ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्यांना पुढच्या तीन सामन्यांत दोन जिंकण्याची गरज आहे.


दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीसाठी यंदाचा हंगाम चढउताराचा राहिला आहे. त्यांनी १२ पैकी ६ सामने जिंकून १० गुणांसह गुणतालिकेत सातवे स्थान पटकावले आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि इतरांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.


कोलकाता नाईट राईड्रस : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कोलकताने दहा पैकी चार सामने जिंकले आहेत. ते ९ गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. संघाला प्लेऑफचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी उर्वरित चारही सामने जिंकावेच लागतील

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून