Nashik NEET Connection : आरोपीने वेश बदलला, केस कापले अन... DCP चौहान यांच्याकडून धक्कादायक माहिती उघड

Nashik NEET Connection : 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द (NEET UG 2026 Cancelled) करण्यात आली आहे. आता, ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला. देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती. मात्र, देशभरात 42 तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्यानंतर आता परीक्षा रद्द करण्यात आली. (Nashik NEET Connection)



नीट परीक्षेचा पेपर फुटीवर आता नाशिक कनेक्शनही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुटलेल्या प्रश्नपत्रेची पहिली प्रत ही नाशिकमध्ये तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. हीच प्रत हरियाणाला पोहोचली, जिथे या फुटलेल्या प्रश्नपत्रेचे 10 संच (sets) तयार करण्यात आले. त्यानंतर, या फुटलेल्या प्रश्नपत्रिकेने मोठा प्रवास केला. पुढे हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच राजस्थान या राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका पोहोचली. या प्रकरणात नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे.


नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 30 वर्षीय युवकाला अटक केली आहे. संशयित आरोपीने BAMS शिक्षण घेतले असल्याची माहिती असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहे. राजस्थान CBI कडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांनी आरोपीचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्याच्या आधारे त्याचा शोध घेत अटक केली, संबंधित युवकाची मेडिकल काऊन्सलिंग एजन्सी आहे. नीट प्रकरणातील पेपरफुटी प्रकरणानंतर आरोपीने पोलिसांपासून बचावासाठी हेअरस्टाईल बदलल्याचे प्राथमिक तपासातून उघड झालं आहे.



DCP किरणकुमार चौहान काय म्हणाले ?


या प्रकरणावर DCP किरणकुमार चौहान म्हणाले की, सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून एकास ताब्यात घेतले आहे. NEET प्रकरणातील हा आरोपी असल्याचे बोलले जात आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक गुन्हे शाखा २ च्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थान पोलिसांचे पथक नाशिकमध्ये येणार आहे त्यानंतर त्यांच्या ताब्यात त्याला देण्यात येणार आहे. आरोपीने वेश बदलला होता केस कापले होते त्यामुळे त्याला निष्पन्न करणे अवघड होते, मात्र तांत्रिक कौशल्य वापरून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे DCP  चौहान यांनी सांगितले आहे.


दरम्यान, आणखी एका धक्कादायक प्रकरणाने नाशिकमध्ये डोके वर काढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली