Rahul Dravid : टी-२० मध्ये फलंदाजी खूप पुढे; गोलंदाज मागे पडत आहेत

IPL 2026 : टीम इंडियाचे माजी मुख्य कोच आणि दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी टी-२० क्रिकेटमधील बदलत्या खेळ पद्धतीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या मते, टी-२० क्रिकेटमुळे फलंदाजांची कामगिरी झपाट्याने सुधारत आहे. गोलंदाज मात्र त्या तुलनेत मागे पडत आहेत.राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारताने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२३ जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. सध्या गोलंदाजांबाबत केलेल्या त्यांच्या विधानामुळे क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे.



नेमकं काय म्हणाले राहुल द्रविड?


राहुल द्रविड यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे, प्रियांश आर्य आणि अभिषेक शर्मा यांसारख्या फलंदाजांनी टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे. त्यांच्या मते, फलंदाज आता मैदानाच्या सर्व भागात मोठे फटके आणि षटकार मारण्याची क्षमता दाखवत आहेत. त्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजीचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. पण भविष्यात गोलंदाजही आपल्या खेळात बदल करतील आणि पुन्हा एकदा गोलंदाजीचे वर्चस्व निर्माण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कसोटी क्रिकेटमध्ये एकेकाळी फलंदाज कधी आक्रमक तर कधी संथ खेळून सामन्याच्या निकालावर प्रभाव टाकायचे. आता गोलंदाज कसोटी सामन्यांवर प्रभाव टाकू लागल्याचे दिसत आहे. अनेक कसोटी सामन्यांमध्ये ३० - ४० विकेट्स जाऊ लागल्या आहेत. हळू हळू टी-२० क्रिकेटमध्येही फलंदाजांप्रमाणेच गोलंदाज प्रभावी ठरतील, असा विश्वास राहुल द्रविड यांनी व्यक्त केला.


युरोपियन टी-२० लीगमध्ये संघाचे मालक


राहुल द्रविड नुकतेच युरोपियन टी२० प्रीमियर लीग मधील एका संघाचे मालक झाले आहेत. त्यांनी डब्लिन गार्डियन्स या संघाची फ्रँचायझी घेतली आहे. या संघाचे नेतृत्व भारताचे माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन करणार आहेत.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून