Axar Patel : दिल्लीला मोठा धक्का ! अक्षर पटेलला झाला एवढा मोठा दंड

मुंबई : अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने दमदार सुरुवात केली होती, मात्र सलग पराभवांनंतर त्यांचे आव्हान संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला होता. पण ११ मे रोजी झालेल्या पंजाब विरूद्धच्या सामन्यात दिल्लीने दमदार विजय मिळवला आणि आव्हान जीवंत ठेवले. मात्र बीसीसीआयने या सामन्यानंतर कर्णधार अक्षर पटेलवर दंड ठोठावला आहे.या सामन्यात अक्षर पटेलने गोलंदाजी केली नाही पण फलंदाजीत मोठे योगदान दिले. पंजाबने दिलेल्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. संघाने सुरुवातीलाच झटपट विकेट्स गमावल्या. मात्र अक्षर पटेलने डेव्हिड मिल्लर सोबत उत्तम भागीदारी केली. त्याने ३० चेंडूंमध्ये ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. यानंतर आशुतोष शर्माने आक्रमक फलंदाजी केली आणि दिल्लीने विजय मिळवला.



बीसीसीआयने दंड का ठोठावला ?


पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्यात स्लो ओव्हररेट प्रकरणी नियमानुसार दिल्ली कॅपिटल्सच्या कॅप्टनला जबाबदार ठरवून बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली. अक्षर पटेलला बीसीसीआयने १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला.बीसीसीआयच्या नियमानुसार आयपीएल २०२६ मध्ये प्रत्येक संघाला आपली २० षटके निर्धारित वेळेत पूर्ण करावी लागतात, विलंब झाल्यास दंड आकारण्यात येतो. पंजाब विरूद्धच्या सामन्यात अक्षरने पूर्ण २० षटके वेगवान गोलंदाजांनाच संधी दिली. यामुळे वेळ वाया गेला आणि बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली.


पंजाब किंग्स विरुद्धच्या विजयानंतर दिल्ली प्लेऑफ शर्यतीत कायम आहे. दिल्लीला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील आणि धावगतीत सुधारणा करावी लागेल. तसेच प्रतिस्पर्धी संघांची कामगिरी वाईट होईल अशीही आशा बाळगावी लागेल. यामुळे दंड झाला तरी प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर अक्षरला झालं गेलं विसरून संघाचं नेतृत्व करण्यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल आणि नियमांचे पालन करावे लागेल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू झाली आहे

Comments
Add Comment

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या