Sunil Tatkare : सुनील तटकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार) अंतर्गत घडामोडींबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी अचानक ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. फुटीनंतर या दोन नेत्यांमध्ये झालेली ही पहिलीच औपचारिक भेट असल्याने, या भेटीच्या नेमक्या टायमिंगवरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. "पवार साहेबांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी वेळ मागितली होती. साहेबांनी आज वेळ दिल्याने मी त्यांची भेट घेतली. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही," असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले. मात्र, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा आणि पक्षांतर्गत फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने याकडे 'राजकीय' दृष्टिकोनातूनच पाहिले जात आहे.



सुनील तटकरे आणि शरद पवार यांची ही भेट अशा वेळी झाली आहे, जेव्हा अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांचा स्पष्ट उल्लेख नसल्याच्या बातम्या समोर आल्या. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला तटकरे आणि पटेल यांचा विरोध असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, तटकरे थेट 'सिल्व्हर ओक'वर पोहोचल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत नक्की काय शिजतेय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण