Trisha Krishnan : शपथविधीला हजेरी अन् आता निवडणुकीची चर्चा; त्रिशा कृष्णन राजकारणात उतरणार?

तामिळनाडू : साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) हिच्या राजकारणातील एन्ट्रीच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय थलपती (Vijay Thalapathy) यांनी तिरुचिरापल्ली पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या जागेसाठी त्रिशा कृष्णनच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. विजय यांनी विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवला होता. त्यापैकी एक जागा रिक्त झाल्याने आता त्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.



राजकीय वर्तुळात त्रिशा कृष्णन टीव्हीके (TVK) पक्षाकडून निवडणूक लढवू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विजय आणि त्रिशा यांच्या चाहत्यांकडूनही तिने राजकारणात यावे, अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून विजय आणि त्रिशा यांच्या अफेअरच्या चर्चांनीही चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे या चर्चांना आणखी रंग चढला आहे.



विशेष म्हणजे, विजय थलपती (Vijay Thalapathy) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या कार्यक्रमाला त्रिशा कृष्णनने उपस्थिती लावली होती. तिच्या उपस्थितीनंतर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले. मात्र, त्रिशा कृष्णन किंवा टीव्हीके पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही अभिनेत्रीच्या संभाव्य राजकीय एन्ट्रीमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’