Nagpur Hanuman Statue : नागपुरात साकारतंय हनुमंतांचं विराट रूप! ७४ फुटी गदा अन् १६२ फुटांची भव्य मूर्ती!

नागपूर : राज्यातील नागपूर शहरात आता भगवान हनुमानांचं एक विराट आणि भव्य रूप साकारले जात आहे. नागपूरच्या कोराडी परिसरात मध्य भारतातील सर्वात उंच १६२ फुटांची बजरंगबलीची मूर्ती उभारण्यात येत असून, या मूर्तीच्या हातात तब्बल ७४ फुटी गदा असणार आहे. विशेष म्हणजे ही गदा जगातील सर्वात मोठ्या गदांपैकी एक मानली जात आहे. या भव्य प्रकल्पाचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याने या सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.



मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात


नागपूरच्या कोराडी परिसरात महालक्ष्मी जगदंबा मंदिराशेजारी उभारली जात असलेली ही भव्य हनुमानाची मूर्ती आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मध्य भारतातील सर्वात उंच आणि आकर्षक हनुमान मूर्ती म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जात आहे. या संपूर्ण संरचनेची उंची फाउंडेशनसह तब्बल २०६ फूट असून, प्रत्यक्ष मूर्तीची उंची १६२ फूट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही मूर्ती उभारण्यात आली आहे.


७४ फुटांची गदा ठरणार विशेष आकर्षण


या मूर्तीतील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे भगवान हनुमानांच्या हातातील ७४ फूट उंचीची विशाल गदा. जगातील सर्वात मोठ्या गदांमध्ये तिची गणना होणार असून, तिची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली आहे. या गदेची भव्यता पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.



या संपूर्ण प्रकल्पामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. मूर्तीवर विशेष धातूचा लेप देण्यात आला असून त्यामुळे ती अधिक आकर्षक, चमकदार आणि टिकाऊ बनली आहे. रात्रीच्या वेळी विशेष लाईटिंग आणि प्रोजेक्शन मॅपिंगच्या साहाय्याने ही मूर्ती विविध रूपांमध्ये पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर प्रोजेक्शनच्या माध्यमातून हनुमान चालीसाचं सादरीकरणही करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना धार्मिक अनुभवासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचाही अनोखा अनुभव घेता येणार आहे.


मध्य भारतातील सर्वात उंच हनुमान मूर्ती


या प्रकल्पाचे मूर्तिकार नरेश कुमावत यांनी सांगितलं की, ही मूर्ती मध्य भारतातील सर्वात उंच हनुमान मूर्ती ठरणार आहे. नवीन तंत्रज्ञान, मजबूत संरचना आणि विशेष धातूच्या लेपामुळे ही मूर्ती अनेक वर्षे टिकाऊ राहणार आहे. तसेच या मूर्तीची गदा देखील जगातील सर्वात मोठ्या गदांपैकी एक ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला.


धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना


या भव्य मूर्तीच्या परिसरात कृत्रिम तलावाचीही निर्मिती करण्यात येत आहे. तसेच मूर्तीच्या पायथ्याशी भगवान बजरंगबलीच्या जीवनातील विविध प्रसंग आणि कार्य यांचं दर्शन घडवणारी विशेष मांडणी केली जाणार आहे. रामायणातील महत्त्वाचे प्रसंग, भक्ती, शक्ती आणि सेवाभावाचे संदेश आधुनिक पद्धतीने सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोराडी परिसर धार्मिक पर्यटनाचं नवं आकर्षण ठरणार असल्याचं बोललं जात आहे.


जूनपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता


नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यापर्यंत या संपूर्ण प्रकल्पाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रकल्प भविष्यात नागपूरची नवी ओळख ठरणार असल्याचं देखील मानलं जात आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी