Nashik TCS Case : आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलचे घर जमीनदोस्त; पहाटेच घरावर हातोडा

छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथील गाजलेल्या टीसीएस (TCS) प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला लपण्यासाठी मदत करणे एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलेच भोवले आहे. गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांविरोधात प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, आज पहाटे मतीन पटेल (Matin Patel) यांच्या निवासस्थानावर महापालिकेने बुलडोझर चालवला. या धडक कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, गुन्हेगारी प्रवृत्तींना मदत करणाऱ्यांसाठी हा एक कठोर इशारा मानला जात आहे.



पोलीस तपासात 'आश्रय' देण्याचे बिंग फुटले


निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना अटकेपासून वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित स्थळ मिळवून देण्यात मतीन पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. केवळ राहण्याची सोयच नाही, तर तपासाची दिशा भरकटवण्यासाठी आणि पोलिसांपासून लपून राहण्यासाठी पटेल यांनी वेळोवेळी मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्यामुळे पोलिसांनी त्यांना आधीच सहआरोपी केले होते, त्यानंतर आता महापालिकेने त्यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवून आर्थिक आणि सामाजिक दणका दिला आहे.



फुलांची उधळण अन् पोलिसांचा कडा पहारा


आज सकाळी ६ वाजता महापालिकेचे पथक बुलडोझरसह घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या या भूमिकेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, कारवाई दरम्यान काही लोकांनी महापालिका आयुक्तांवर फुलांची उधळण केली. निदा खान ज्या घरात ७ दिवस राहिली होती, त्या घरावरही लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.



इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी


मतीन पटेल यांच्यावर झालेली ही कारवाई केवळ घरापुरती मर्यादित नसून, नारेगाव परिसरातील त्यांचे कार्यालय आणि इतर मालमत्तांवरही महापालिकेची टांगती तलवार आहे. या मालमत्तांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास तिथेही बुलडोझर फिरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता तीव्र राजकीय वळण लागले आहे. राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणात थेट माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी